File photo
File photo 
विदर्भ

पंढरपूरला हिंसा होण्याचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य निषेधार्ह

सकाळवृत्तसेवा

नागपूर : पंढरपूरला मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे हिंसा होण्याची शक्‍यता असल्याने महापूजा न करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कृती निषेधार्ह असल्याचे ट्‌विट प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी केले. दरवर्षी आषाढी एकादशीला महापूजेचा मान मुख्यमंत्र्यांना मिळतो. दरवर्षी मुख्यमंत्री सपत्निक महापूजा करतात. यंदा मराठा आरक्षणासाठी मागणी करणाऱ्या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांना पूजा करू न देण्याचा इशारा दिला होता. यावरून पंढरपुरात चेंगराचेंगरी तसेच सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, अशी भीती असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजा न करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी टीका केली. यासंदर्भात ट्‌विट करून नाना पटोले म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून लाखो लोक पंढरपुरात येतात. तेथे कधीही चेंगराचेंगरी झाली नाही. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात शांततेत आंदोलन पार पडले. या शांती मोर्चाची देशभरातच नव्हे, तर जगातील प्रसारमाध्यांमध्ये प्रशंसा झाली. ही वस्तुस्थिती असताना मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे हिंसा करतील, अशी भीती दाखविणे हे चुकीचे तसेच निषेधार्ह असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT