आशीष राऊत
आशीष राऊत 
विदर्भ

कोचिंग क्‍लास संचालकाच्या भावासह दोघे गजाआड

सकाळ वृत्तसेवा


अमरावती,  ः अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाच्या "मॅकेनिक' या विषयाचा पेपर फूटल्याप्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी कोचिंग क्‍लास संचालकाच्या भावासह विद्यापीठातील कर्मचाऱ्याला अटक केली. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविल्या गेला ते सर्वच पोलिसांच्या रडारवर आहेत.
आशीष श्रीराम राऊत (वय 28, रा. बोर्डी, ता. अकोट) व निखिल अशोक फाटे (वय 27, रा. गाडगेनगर, अमरावती), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यापैकी निखिल हा कोचिंग क्‍लासेसच्या संचालकाचा सख्खा भाऊ असल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजू लेवटकर यांनी सांगितले. राऊत हा घटनेच्या वेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात रोजंदारी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. पेपरफूट प्रकरणातील मुख्य सूत्रधार व वाशीमच्या संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाचा लिपिक ज्ञानेश्वर बोरे अद्याप पसार आहे. फ्रेजरपुरा पोलिसांचे एक पथक बुधवारी (ता.12) वाशीम येथील महाविद्यालयात जाऊन आले, शिवाय त्यांनी मालेगाव येथील त्याच्या घरीसुद्धा चौकशी केली, परंतु बोरे हा पसार असल्याचे सांगितले.
पेपर सुरू होण्याच्या दीड तासापूर्वी वाशीम जिल्ह्यातील संमती अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या केंद्रावर तो पोचला. पेपरची वेळ सुरू होण्याच्या दीड तासापूर्वी लिपिक बोरे याने मोबाईलने छायाचित्र काढून तो राऊत याला पाठविला. राऊतने कोचिंग क्‍लासेसच्या संचालकाचा भाऊ निखिल फाटे याच्या मोबाईलवर तो पेपर पाठविला. निखिलने रिठे नामक विद्यार्थ्यास, रिठेने नंतर गालट व निस्ताने या दोन विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर हा पेपर पाठविला. असे फ्रेजरपुरा पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीतून निष्पन्न झाले. अटक फाटे व राऊतला पोलिसांनी गुरुवारी (ता.13) न्यायालयात हजर केले.

याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, जे जे रडारवर येतील त्यांच्याविरुद्ध कारवाई होईल. शक्‍य तेव्हा विद्यापीठातील अधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविल्या जाईल.
-आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, फ्रेजरपुरा ठाणे
.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT