विदर्भ

युती सरकार खोटे आश्वासन देणारे

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : मागील तीन वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त आहे, त्यांना कोणतीही मदत केली नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली, परंतु अजूनही त्याच्या लाभापासून अनेक जण वंचित आहेत, ही खेदजनक बाब आहे. युती सरकार खोटे आश्‍वासन देणारे असल्याचा आरोप मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केला.सावनेर मतदारसंघात कॉंग्रेसचे उमेदवार सुनील केदार यांच्या प्रचारासाठी आलेले कमलनाथ यांनी केळवद, मोहपा व भानेगाव येथे प्रचारसभा घेतल्या. त्यावेळी त्यांनी युती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कमलनाथ म्हणाले, मध्य प्रदेशात कॉंग्रेसचे सरकार आल्यावर तडकाफडकी कर्जमाफी करून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने मदत केली. महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, त्यांना रोजगाराच्या संधी मिळवून देण्यातही सरकार अपयशी ठरल्याने युती सरकारने बेरोजगारांच्या तोंडाला पाने पुसली. केंद्र सरकारच्या धोरणावर टीका करून त्यांनी संत्रा उत्पादकांची व्यथा मांडली. ते म्हणाले, केंद्र सरकारचे धोरण अजब आहे, जगप्रसिद्ध नागपुरी संत्रा दिल्लीत खाण्यास उपलब्ध नसला तरी तो अमेरिकेत मात्र मिळतो. संत्रा बाजारपेठेत व्यापाऱ्यांचे वर्चस्व आहे. केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांना संत्रा पिकासाठी कोणते उच्च तंत्रज्ञान देण्याचा प्रयत्न केला नाही. सावनेर क्षेत्रांमध्ये विकासकामे करून घेण्यासाठी सुनील केदार यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे सांगून त्यांनी येथे झालेल्या विकासकामांत त्यांची असलेली भूमिका विशद केली. दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यासाठी पोलिसांचा मोर्चा सांभाळताना देश रक्षणासाठी शहीद झालेले हेमंत करकरे यांचा अपमान करणारे आज भाजपचे खासदार आहेत, असे कमलनाथ यांनी सांगून फडणवीस सरकारच्या धोरणावर हल्ला चढविला. युतीपूर्वी पंधरावर्षे आघाडीचे सरकार होते. त्यावेळी राज्यातील शेतकरी सुखी होता, ते दिवस पुन्हा आणायचे असतील तर कॉंग्रेसला मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Skin Care : त्वचाविकार कधी येणार गरिबांच्या आवाक्यात ; मेडिकलला तीन वर्षांपासून ‘फ्रॅक्शनल सीओटू’ लेझर यंत्राची प्रतीक्षा

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT