विदर्भ

आचारसंहितेचा धसका, मंजुरीचा धडाका!

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता 13 सप्टेंबरपासून लागण्याची शक्‍यता आहे. आचारसंहितेचा धसका घेत महापालिका स्थायी समितीच्या विशेष बैठकीत आज 94 कोटींच्या विकासकामांना हिरवा कंदील दाखविण्यात आला. यात 53.29 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता तर 40.73 कोटींच्या निविदा मार्गी लावण्यात आल्या.
विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून गणेश विसर्जनानंतर लगेच दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची घोषणा केली जाण्याची शक्‍यता अधिकारी व्यक्त करीत आहेत. त्यामुळे आचारसंहितेपूर्वीच निविदा मंजुरी, कार्यादेश देऊन विकासकामांचा मार्ग मोकळा करण्यावर भर देण्यात आला. पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांच्या प्रभागातील विकासकामांच्या फाईल्सचा निपटारा करण्यात येत आहे. आज स्थायी समितीच्या तासभराच्या विशेष बैठकीत सर्वच विषय चर्चेविनाच मंजूर करण्यात आले. यात 53.29 कोटींच्या विकासकामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. तर 40.73 कोटींच्या निविदांना मंजुरी प्रदान करण्यात आली.
पंदेकृविच्या जागेवर सायकल, जॉगिंग ट्रॅक
व्हीआयपी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जागेत सायकल ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक तयार करण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही महिन्यापूर्वी केली होती. या घोषणेची दखल घेत स्थायी समितीने आज 7 कोटी 80 लाख 56 हजारांच्या निधीस मंजुरी दिली. या कामासाठी मे. जखापूर जगदंबा कन्स्ट्रक्‍शन प्रा. लिमिटेडची निविदा मंजूर करण्यात आली. 20 फेब्रुवारी 2002 रोजी या विकासकामांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT