Cold wave continues in Vidarbha 
विदर्भ

विदर्भात थंडीची लाट कायम, नागपूर @ ८.६  

नरेंद्र चोरे

नागपूर  : उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे आलेल्या शितलहरीचा तीव्र प्रभाव विदर्भात मंगळवारीही दिसून आला. सोमवारच्या तुलनेत उपराजधानीच्या किमान तापमानात थोडी वाढ अवश्य झाली, परंतु बोचरे वारे व हवेतील गारठ्याने नागपूरकरांची आजही चांगलीच परीक्षा घेतली.

थंडीच्या लाटेने नागपूरसह अख्ख्या विदर्भालाच कवेत घेतले आहे. सलग तीन दिवसांपासून नागपूरचा पारा दहा अंशांच्या खाली आहे. काल नीचांकी ८.४ अंशांवर गेलेला पारा आज किंचित वाढून ८.६ अंशांवर आला. गोंदिया येथे लागोपाठ चौथ्या दिवशी विदर्भात सर्वात कमी म्हणजेच ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. 

याशिवाय यवतमाळ (८.५ अंश सेल्सिअस), गडचिरोली (९.० अंश सेल्सिअस), अकोला (९.६ अंश सेल्सिअस) व चंद्रपूरवासीही (९.६ अंश सेल्सिअस) जिल्हेही कडाक्याच्या हैराण आहेत. शहरात दिवसभर बोचरे वारे व गारठा जाणवला. सायंकाळी व रात्री पडणाऱ्या दवांमुळे वातावरण आणखीणच गारठते. थंडीचा सर्वाधिक फटका लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना बसतो आहे. प्रादेशिक हवामान विभागाने थंडीची लाट अणखी आठवडाभर राहणार असल्याचे सांगितले आहे.

प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भात थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दिवसभर गार वारे अंगाला झोंबतात. सायंकाळ होताच गारठा आणखी वाढतो. हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता सध्यातरी वैदर्भींची थंडीपासून सुटका होण्याची शक्यता कमीच आहे. विदर्भात सलग तिसऱ्या दिवशी गोंदिया येथे सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. 

विदर्भात उशिरा का होईना थंडीची तीव्र लाट आली. नागपूरसह सर्वच शहरांमध्ये कडाका वाढला असून, यंदाच्या मोसमात उपराजधानीचा पारा प्रथमच ८.७ अंशांपर्यंत घसरला आहे. या आठवड्यात थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात सुरू असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे दोन दिवसांपासून विदर्भात कडाक्याची थंडी जाणवत आहे. गारठ्यामुळे पाऱ्यात दिवसेंदिवस घसरण होत आहे. हवेतील गारठ्यामुळे दिवसभर हुडहुडी जाणवते. सायंकाळ होताच गारठा वाढू लागतो. अचानक थंडी वाढल्यामुळे एसी बंद झाले असून, पंख्याचीही स्पीड कमी झाली आहे. उत्तर भारतात बर्फवृष्टी आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने, विदर्भातही थंडीचा मुक्काम लांबणार आहे. नववर्षापर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचे संकेत हवामान विभागातर्फे देण्यात आले आहे. 

संपादन : अतुल मांगे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Weather Alert : सांगलीकरांनो, पुढील 5 दिवस घराबाहेर पडताना काळजी घ्या! 50 किमी वेगाने वादळी वारे अन् 'या' वेळेत कोसळणार मुसळधार पाऊस

ULC land Conversion: शेतकऱ्यांना मोठा दिलासा! यूएलसी वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रूपांतर सुलभ; नजराणा शुल्कात मोठी कपात, मात्र शासनाची काय आहे अट ?

'लाडकी बहीण'च्या ई केवायसीला मुदतवाढ मिळाल्याचा व्हिडीओ व्हायरल, महिलांची अर्ज घेण्यासाठी विनवणी; अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

अगं काव्या ताई किती... ज्ञानदाच्या लग्नाच्या तयारीत मृणालच्या लेकीने विचारला असा प्रश्न; ऐकून सगळेच हसून झाले बेजार!

ODI Tri-Series: टीम इंडियात अचानक बदल! विदर्भाच्या खेळाडू संघातून बाहेर, बदली खेळाडूची घोषणा

SCROLL FOR NEXT