डॉ. परिणय फुके
डॉ. परिणय फुके  
विदर्भ

"गोरेवाडा'चा पहिला टप्पा 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांना गती देण्यासोबतच पहिल्या टप्प्यातील कामे येत्या 15 ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी आज वनाधिकाऱ्यांना दिले.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाचा संपूर्ण आराखडा 451 कोटी रुपयांचा असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये खर्चाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिलेत. वनभवनात आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय तसेच अंबाझरी जैवविविधता उद्यान निर्मितीच्या कामांचा आढावा डॉ. फुके यांनी घेतला. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यू. के. अग्रवाल, वनविकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रामबाबू, गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाचे विभागीय व्यवस्थापक नंदकिशोर काळे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. एच. हुडा, मुख्य वनसंरक्षक कल्याणकुमार, एस्सेलवर्ल्डचे त्यागी होते.
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाची निर्मिती वनविकास महामंडळ, गोरेवाडा प्राणिसंग्रहालय प्रा. लि. तसेच एस्सेलवर्ल्ड सहा वर्षांत टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. संपूर्ण आराखडा 451 कोटी रुपयांचा असून पर्यटकांसाठी बिबट सफारी, इंडियन (अस्वल) सफारी तसेच निसर्ग व वन्यप्राणी सफारी सुरू करण्यात येणार आहे. सफारीची सुविधा सुमारे 125 हेक्‍टर क्षेत्रात राहणार आहे. आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालय मध्य भारतासह देशातील प्रमुख केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने कालबद्ध कार्यक्रम तयार केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT