File photo
File photo 
विदर्भ

राहुलास्राने भाजप घायाळ

राजेश चरपे

नागपूर : महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीतून कॉंग्रेसने निवडणुकीचा बिगुल फुंकला असून राहुल गांधी यांचे मुद्देसूद तेवढेच जोषपूर्ण भाषण आणि त्यास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कॉंग्रेसला लढण्याची नवी ऊर्जा मिळाली आहे.
इंदिरा गांधी यांच्या पडत्या काळात विदर्भाने त्यांना साथ दिली होती. त्यामुळे महात्मा यांच्या कर्मभूमीतून पक्षाला उभारी मिळेल अशी आशा कॉंग्रेस बाळगून आहे. महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून कॉंग्रेसने राष्ट्रीय कार्यसमितीच्या बैठकीसाठी सेवाग्रामची निवड केली. कॉंग्रेसची येथेच 71 वर्षांपूर्वी झालेली कार्यसमितीची बैठक ऐतिहासिक ठरली होती. ब्रिटिशांच्या वाढत्या अत्याचाराला विरोध करण्यासाठी सेवाग्रामला कॉंग्रेसने "ब्रिटिश सरकार चलेजाव'चा नारा दिला होता. त्यानंतर देशात एकप्रकारे चमत्कारिक चैतन्य निर्माण झाले. त्यामुळे इंग्रजही घाबरले. शेवटी त्यांना भारत सोडून जावा लागला. हाच इतिहासाचा धागा पकडून कॉंग्रेसने पुन्हा एकदा कार्यसमितीची बैठक सेवाग्रामला घेतली. या बैठकीलाही ब्रिटिशांप्रमाणेच भाजप सरकार चले जाव असे स्वरूप देण्यात आले. त्याची दहा कारणेही सांगण्यात आली.
वर्धेत झालेले भाषण राहुल यांच्या परिपक्वता दर्शवणारे होते. त्यांनी मोदी यांच्याच स्टाइलने श्रोत्यांकडून काही गोष्टी वदवून घेतल्या आणि त्यांना उघडे पाडले. तुमच्या खात्यात 15 लाख जमा झाले की नाही अशी विचारणा त्यांनी केली. श्रोत्यांमधून तेवढ्याच उत्स्फूर्तपणे नाही...असा प्रतिसाद आला. त्यानंतर दोन कोटी युवकांना नोकऱ्या मिळल्या का?, शेतमालाला दुप्पट दाम मिळाले की नाही अशी विचारणा केली. अशा पद्धतीने भाजपने दिलेल्या आश्‍वासनांचा पाढा त्यांनी वाचला आणि श्रोत्यांच्या तोंडूनच त्यांना उघडे पाडले. यावरून राहुल गांधी यांची टिंगलटवाळी करणे आणि मतदारांना गृहीत धरणे भाजपच्या अंगलट येऊ शकते.
"पप्पा' म्हणायची वेळ आणली
कालपर्यंत भाजपने जे केले तेच राजकारण आज कॉंग्रेस करीत आहे. भाजपने बोफोर्स गाजवून कॉंग्रेसला बॅकफूटवर ढकलले होते. कॉंग्रेसच्या हाती आता राफेल अस्त्र लागले आहे. त्याचा पुरेपूर वापर करण्याचे कॉंग्रेसने ठरविले आहे. महिनाभरापासून प्रत्येक नेता राफेलच्या घोटाळ्यावर जागोजागी भाषणे ठोकत आहे. त्यामुळे पानठेलेवाल्यालाही राफेल करार आता कळायला लागला आहे. राहुल गांधी यांच्या आक्रमक शैलीचे हे फलितच म्हणावे लागले. कालपर्यंत "पप्पू' म्हणून हिणवणाऱ्या राहुल यांना भाजपवाल्यांवर आता त्यांना "पप्पा' म्हणायची वेळ आणली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : विजय शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला

SCROLL FOR NEXT