विदर्भ

दोन कोटींचा तेंदूपत्ताच्या हप्ता ठेकेदाराकडून ग्रामसभेला

मनोहर बोरकर

एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत गट्टा, जांबिया, गर्देवाड़ा, वांगेतुरी व जवेली अशा पाच ग्रामपंचायत क्षेत्रातील साठ गावातील नागरिकांचे आठ करोड़ सत्तर लाख 56 हजार 344 रुपयेची सन 2017 च्या हंगामातिल तेंदूपत्ता संकलन मजूरी देण्यास स्नेहल ट्रेडिंग कंपनी गोंदिया टाळाटाळ करीत असल्याने जिल्हा परिषद सदस्य तथा ग्रामसभा अध्यक्ष सैनु गोटा, जिल्हा परिषद सदस्य तथा तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय चरडुके, पंचायत समिति सदस्य शिला गोटा, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार व नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धड़क देऊन मजूरांची मजूरी रक्कम मिळवून देण्याची मागणी निवेदनातून केली होती. 

जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी संबधित ठेकेदार स्नेहल ट्रेडिंग कंपनी व तक्रारकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिति व ग्रामसभा पदाधिकारी यांची (ता 15 सेप्टेंबर) ला जिल्हाधिकार्यालयात बैठक घेऊन मजूरांची थकित रक्कम चार टप्प्यात भरना करण्याचे समन्वयतून ठरविले होते. त्यामुळे पहिला हप्ता (ता.1 ऑक्टोबर) पूर्वी व उर्वरित तीन हप्ते पुढील एक महिन्यात अदा करण्याचे स्नेहल कंपनीने मंजूर केल्या प्रमाणे पहिला हप्ता दोन करोड़ रुपये गट्टा, गर्देवाड़ा, वांगेतुरी व जवेली या ग्रामसभाच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायत अतिदुर्गम, मागास व नक्षल प्रभावी क्षेत्रातील असून परिसरातील साठ गावातील शेकडो मजूर नागरिकांनी सन 2017 मध्ये पेसा कायदा नुसार स्थानिक ग्रामस्थरीय सहनियंत्रण समितीच्या माध्यमातून दिनांक 30 एप्रिल 2017 रोजी स्नेहल ट्रेडिंग कंपनी गोंदियाला आवश्यक लीलाव बोलीतुन लीलाव मंजूर केला होता. त्यावेळी मजूरांनी पंधरा करोड़ सहा लाख 71 हजार 660 रुपये महसुली  किंमतीचा तेंदूपत्ता संकलन केले होते. त्यातील सहा करोड़ 9 लाख 15 हजार 316 रुपये स्नेहल कंपनीने दोन टप्प्यात अदा केले होते. मात्र, त्यानंतर एक वर्षाचा कालावधी होऊनही दोन किस्तीत द्यावयाची रक्कम आठ करोड़ 70 लाख 56 हजार 344 रुपये देण्यास कंपनी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने, ग्रामसभांनी (ता 3 सप्टेंबर) ला जिल्हाधिकारी यांना प्रत्येक्ष भेटून निवेदनातून थकित रक्कम मिळवून देण्याची मागणी केली होती. 

निवेदनात मजूरांच्या दैनदिन जीवनमानावर विपरीत परिमाण झाला असून विवाह योग्य तरुण तरुणींचे जुळलेले लग्न पैसा अभावी तोडल्या गेले. उपजीविका व आजारपनात दुकानदार व नातेवाईकांकडून घेतलेली उधार-उसनवार परतफेड करने कठिन झाले. तसेच आज आमच्या शेकडो कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. असे जिल्हा परिषद सदस्य सैनु गोटा, संजय चरडुके, पंचायत समिति सदस्य शिला गोटा, नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार, उलगे तिम्मा, मंगेश नरोटे, प्रशांत गोटा, रानू नरोटे, मंगेश होळी व नागरिकांनी निवेदनात नमूद केले होते,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajiv Gandhi : राजीव गांधींच्या हत्येबाबत इस्रायलने आधीच दिली होती सूचना, नंतर महत्त्वाचे दस्तावेज गायब; एक्स्पर्टचा दावा

CCF Tea For Thyroid : Thyroid वर मात करायची असेल तर CCF चा हेल्दी चहा प्या, नक्की फरक पडेल

Fake Deepfake's : खऱ्या किंवा एडिटेड व्हिडीओजना लावलं जातंय 'डीपफेक' चं लेबल

Lok Sabha Poll 2024 : ठाकरे गटाचा आणखी एक उमेदवार रिंगणात ? माजी महापौर रमेश म्हात्रे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Jalgaon News : अपघातातील जखमीला उपचारासाठी न नेता दिले दरीत टाकून; आरोपी मालवाहू पिकप चालकास अटक

SCROLL FOR NEXT