Corona positive was found in Warud taluka of Amravati district 
विदर्भ

कोरोना विषाणूचा 'कॅलिफोर्नियात' शिरकाव

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून प्रसिद्ध असलेल्या वरुड तालुक्‍यात कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील चालकाची पत्नीच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तालुका प्रशासन क्‍वारंटाईन झाले आहेत. 

वरुडचे तहसीलदार सुनील सावंत यांच्या शासकीय वाहनावरील चालकाची 50 वर्षीय पत्नीला चार दिवसांपूर्वी सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने डॉ. बहिरे यांच्याकडे 28 एप्रिलला उपचारार्थ नेण्यात आले होते. संबंधित महिलेस श्‍वसनाचा त्रास असल्याची बाब तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख आणि वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोद्दार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनी महिलेची तपासणी केली. 

कोरोनाची लक्षणे आढळल्याने संबंधित महिलेस नागपूर येथे उपचारार्थ पाठविण्यात आले. येथे महिलेचा कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी (ता. एक) सकाळी पॉझिटिव्ह आल्याने तालुका प्रशासनाचे धाबे दाणाणले. पुन्हा खात्री म्हणून नमुन्याची दुबार चौकशी करण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व प्रयोगशाळेला साकडे घालण्यात आले. दुपारी दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वरुड तालुका प्रशासनाचे अवसान गळाले व प्रशासनात जबरदस्त खळबळ उडाली. 

यानंतर तहसीलदार सुनील सावंत यांनी चालकासमवेत तालुका कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पिंजून काढला आहे. ठिकठिकाणचे सरपंच, ग्रामसेवक, गावकरी, पुढारी यांना भेटून कोरोनाच्या प्रतिबंधासाठी व कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले. त्यासाठी तालुकास्तरीय अधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या आहेत. 

अमरावती शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वप्रथम दोन एप्रिलला हाथीपुरा येथे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नमुण्यातून चार एप्रिलला आढळला होता. त्याचा नमुना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कोरोना विषाणूने स्थानिक हाथीपुरा, हैदरपुरा, कमेला ग्राउंड, तारखेडा, पाटीपुरा, इमामनगर (युसुफनगर), बडनेरा, खोलापुरीगेट, हनुमाननगर, ताजनगर, नालसाबपुरा, कंवरनगर, चेतनदास बगीच्या, लालखडी या भागात प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांनी जखडून ठेवलेला कोरोना विषाणू आता शहरातून 90 किलोमीटर अंतरावररील थेट वरुड तालुक्‍यात पोहोचला आहे. 

थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू

तहसीलदार सावंत यांच्या संपर्कात वरुडचे ठाणेदार मगन मेहते, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख, वैद्यकीय अधीक्षक प्रमोद पोद्दार, पंचायत समितीचे खंडविकास अधिकारी वासुदेव कनाके आदी अधिकारी आलेले आहेत. त्यांना क्‍वारंटाईन राहण्यास सांगण्यात आलेले आहे. संबंधितांचे थ्रोट स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी सांगितले. 

अंत्यसंस्कारात झाली लागण!

संबंधित महिला कुटुंबातील सदस्याच्या अंत्यसंस्कारासाठी मागच्या आठवड्यात चांदूर रेल्वे येथे गेल्याचे सांगण्यात येते. संबंधित महिलेस कोरोनाची लागण नेमकी कुठे, केव्हा आणि कोणापासून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्या दृष्टनीने तपास करण्यात येत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT