Road Works 
विदर्भ

Amravati Accident: धामणगावातील सिमेंट रस्त्यांवर पडल्या भेगा! दुचाकी चालकांचे अपघात

सकाळ डिजिटल टीम

धामणगावरेल्वे, (जि. अमरावती) : शहरातील सिमेंटच्या काही रस्त्यांवर पडलेल्या भेगा दुचाकीस्वारांसाठी अडचणीच्या ठरत आहेत. या भेगांवरून गाडी चालविताना घसरण्याचे प्रकार घडत आहेत.

वाढत्या वाहनसंख्येमुळे सध्या वाहतूक धोकादायक झाली असतानाच सिमेंटच्या रस्त्यावरील भेगांमुळे त्यात आणखी भर पडली आहे. त्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात होत आहे. नगरपरिषदेने या गंभीर समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

शहरात सध्या सिमेंटच्या रस्त्यांचे पेव फुटले आहे. मुख्य रस्त्यांपासून अंतर्गत छोट्या रस्त्यांपर्यंत सर्वत्र सिमेंटचे रस्ते बांधण्यावर पालिकेचा भर आहे. मात्र, सिमेंटच्या रस्त्यांना पडणाऱ्या भेगा ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. सिमेंट रस्त्यावर विविध कारणांमुळे भेगा पडणे ही सामान्य बाब आहे.

किरकोळ आणि कमी खोल भेगा दुर्लक्षित करण्याजोग्या असतात. बहुतेक भेगा दुरुस्तही करता येतात. तीन मिलीमीटरपेक्षा जास्त रुंदीची भेग असेल तर ती गांभीर्याने घेतली जाते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

मात्र, शहरातील काही रस्त्यांवर मध्यभागी आणि जोड भागात (जॉइंट्सला) भेगा पडल्या आहेत. त्या भेगांवरून गाडी जाताना ती घसरण्याची शक्यता असते. काही ठिकाणी गाडी घसरून अपघात होत आहेत.

भगतसिंग चौक-रेल्वेफाटक रस्ता फार पूर्वी सिमेंटचा करण्यात आला. या रस्त्यावर भेगांचे प्रमाण अधिक आहे. खोलवर आणि रुंद भेगांमुळे या रस्त्याने जाताना दुचाकी चालकांना विशेष काळजी घ्यावी लागते. गांधी चौक ते परसोडी हा रस्ताही सिमेंटचा आहे.

या रस्त्यावरही भेगांचे अस्तित्व मोठ्या प्रमाणावर दिसून येते. उभ्या भेगांबरोबरच या रस्त्यावर आडव्या भेगाही आहेत. तसेच एक-दोन ठिकाणी सिमेंट उखडल्याने खड्डेही पडले आहेत. तेथेही वाहन चालकांना याच परिस्थितीचा सामना करावा लागतो. शहरात अनेक ठिकाणी सिमेंट रस्त्यांवर थोड्याबहूत प्रमाणात हे चित्र दिसून येते.

सिमेंटच्या रस्त्यांना जॉइंट्सच्या ठिकाणी भेगा पडतात. त्या भेगा योग्यप्रकारे भरून काढणे गरजेचे असते. त्या भेगा न भरल्यास रस्त्याचे आयुष्य कमी होण्याची शक्यता असते.

सिमेंटच्या रस्त्यांची आवश्यक काळजी न घेतल्यास रस्त्यांची देखील काही वर्षांतच दुर्दशा होते. त्यामुळे त्यांची नियमित काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

-श्रीकांत रोंघे, अभियंता, धामणगावरेल्वे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! नववर्षाच्या पूर्वसंध्येला उजनी धरण १०० टक्के भरेलेलेच; शेतकऱ्यांना १५ जानेवारीनंतर रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन, वाचा...

आजचे राशिभविष्य - 29 डिसेंबर 2025

Morning Breakfast Recipe: गव्हाच्या पीठात कांदा टाकून बनवा 'हा' खास पदार्थ, सर्वजण करतील कौतुक

Satara Crime:'शिरवळला मारहाणीतून एकाचा खून';दोघेजण पाेलिसांच्या ताब्‍यात, एकुलता एक मुलाबाबत घडला धक्कादायक प्रकार?

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 29 डिसेंबर 2025

SCROLL FOR NEXT