File photo
File photo 
विदर्भ

घरभाडे थकविल्याने बलात्कार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : घरभाडे थकविल्याने महापालिकेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्याने 25 वर्षीय भाडेकरू महिलेवर बलात्कार केला. एवढेच नव्हे तरआपल्या मित्रांशीसुद्धा तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून घरमालक व त्याच्या मैत्रीणीवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. घरमालक माणिक रामचंद्र शेवारे (वय 53, रा. लष्करीबाग) आणि आशा भूषण शर्मा (वय 50, रा. पिवळी नदी, जरीपटका) अशी आरोपींची नावे आहेत.
पीडित 25 वर्षीय महिला रिना (बदललेले नाव) ही पती व दोन मुलांसह जरीपटक्‍यातील पिवळी नदी परिसरात भाड्याने राहते. हे दाम्पत्य मूळचे मध्यप्रदेशातील बालाघाटचे आहे. पती मिळेल ते काम करून घरखर्च भागवतो. घरमालक माणिक शेवारे हा महापालिकेत मोहरीर पदावर कार्यरत आहे. त्याची महिलेवर सुरुवातीपासूनच वाईट नजर होती. मे महिन्याचे घरभाडे मागण्यास माणिक तिच्या खोलीवर आला. रिनाने पैशाची अडचण असल्याचे सांगून महिनाभर थांबण्यास सांगितले. मात्र, तिची असहायता ओळखून त्याने घर रिकामे करण्यास सांगितले. तिने गयावया केली असता त्याने घरात ओढून तिच्याशी अश्‍लिल चाळे केले. आरडाओरड केल्यास घराबाहेर काढण्याची धमकी दिली. त्यानंतर जून महिन्यात भाडे मागण्यासाठी आला आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची थेट मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. त्यानंतर घरातून बाहेर काढण्याची धमकी देऊन तो नेहमीच शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता.
असहायतेचा घेतला फायदा
रिनाचा पती आजारी पडला. इस्पितळाचे 25 हजार रूपये बील आल्यानंतर रिनाने आरोपी माणिक शेवारेला कर्ज मागितले. कर्ज फिटेपर्यंत वाटेल तेव्हा शारीरिक संबंध ठेवण्याची त्याने अट घातली. पतीच्या आजारामुळे हतबल असलेल्या रिनाने होकार दिला. तेव्हापासून तो तिला वेगवेगळ्या ठिकाणावर नेऊन लैंगिक शोषण करीत होता.
देहव्यापारात प्रवेश
25 हजार रुपयाच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नेवारने रिनाची शेजारी राहणारी मैत्रीण आशा भूषण शर्मा हिची भेट घालून दिली. आशाने तिला आंबटशौकीन ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवल्यास तासाभराचे 500 रुपये अशी मजुरी ठरविली. आशाच्या घरात तिच्याकडून देहव्यापार करवून घेतला तसेच सीताबर्डीतील काही लॉजवरही तिला ग्राहकांसोबत पाठविण्यात आले.
पतीची नसबंदी; पत्नी गर्भवती
रिना ही पाच महिन्यांची गर्भवती आहे. मात्र, तिच्या पतीने गेल्या दोन वर्षांपूर्वीच नसबंदीचे ऑपरेशन केले आहे. रिनाने पतीला सर्व हकीकत सांगितल्यानंतर माणिक शेवारे आणि आशाचे पाप उघडकीस आले. जरीपटका पोलिसांनी माणिकला अटक केली तर आशा फरार झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT