Crowds to buy vegetables
Crowds to buy vegetables 
विदर्भ

याला काय म्हणावे!  भाजीपाला खरेदी करण्यासाठी  तोबा गर्दी

सकाळ वृत्तसेवा

खामगाव (जि.बुलडाणा) : आज सकाळी खामगाव आणि शेगाव येथील भाजीबाजारात लोकांनी भाजीपाला खरेदी करण्यासाठी अक्षरशा तोबा गर्दी केली. यावेळी सुरक्षित अंतर देखील पाळण्यात येत नव्हते त्यामुळे दिवसभर घरात राहून जिभेचे चोचले पुरविण्यासाठी एक दोन तास बाहेर आलेले नागरिक लॉकडाऊन संकल्पनेला कशा प्रकारे हरताळ हसतात, हे दिसून आले. 


केंद्र सरकारने कोरोना या वैश्विक आजारापासून आपला देश वाचविण्यासाठी येत्या 21 दिवस संचारबंदी जारी केली आहे. या संचारबंदी तून जीवनावश्यक वस्तू वगळण्यात आले आहेत मात्र त्या खरेदी करण्यासाठी नागरिकांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे ती घेतल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. संधी दिली की त्याचा गैर फायदा घेतल्या जात आहे. सकाळी लोक विनाकारण घराबाहेर पडतात. गर्दी करतात,  हे आज पुन्हा एकदा दिसून आले. आजही  खामगाव शेगाव येथे भाजी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले. यावेळी खबरदारीच्या उपाययोजना व नियमाचे उल्लंघन होत आहे. बहुतांश नागरिकांनी मास्क घातले नसल्याचे दिसून आले तसेच सुरक्षित अंतर देखील पाळण्यात आले नाही.  त्यामुळे कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत , त्याला एक प्रकारे नख लावण्याचे काम नागरिकांकडूनच सुरू असल्याचे दिसून येते. या बेजबाबदार नागरिकांना वेळीच समज देणे गरजेचे झाले आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे
किराणा, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याच्या नावाखाली नागरिक बाजारात गर्दी करत आहेत. त्यातून कोरोना प्रादुर्भाव व प्रसार होण्याची शक्यता दाट आहे.  या गंभीर प्रकाराकडे शासनाने लक्ष देण्याची गरज असून जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील, किंवा गर्दी होणार नाही अशी पर्यायी व्यवस्था निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

गर्दी टाळण्यासाठी हे करावे
- एका ठिकाणी  बाजार न भरविता ठराविक हातगाड्या व विक्रेते यांना ठराविक वेळेत द्वारपोच भाजीपाला, दूध, फळे पोहचविण्यास नियमानुसार परवानगी
- काही व्यापारी बांधवानी घरपोच किराणा देण्यासाठी तयारी दर्शवली आहे त्याबाबत विचार व्हावा
- गर्दी होणार नाही यासाठी स्थानिक पातळीवर योग्य उपाययोजना कराव्यात
- नागरिक गर्दी करत असल्याने संचारबंदी च्या अंमलबजावणी साठी कठोर भूमिका घेणे गरजेचे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

SCROLL FOR NEXT