गडचिरोली : गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमात संवाद साधताना सायकलपटू अंकित अरोरा.
गडचिरोली : गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यक्रमात संवाद साधताना सायकलपटू अंकित अरोरा. 
विदर्भ

सायकलपटू अंकित अरोराने गडचिरोलीकरांशी साधला संवाद

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मागील तब्बल 26 महिन्यांपासून सायकलने भारतभ्रमण करणाऱ्या राजस्थान राज्यातील अजमेर (जयपूर) येथील अंकित अरोरा (वय 19) या युवकाचे गडचिरोलीत आगमन झाले. त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या शाखेला भेट देत नागरिकांशी संवाद साधला. शनिवारी (ता. 19) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या भारतभ्रमणाच्या प्रवासातील अनुभवांची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे विश्‍वस्त डॉ. शिवनाथ कुंभारे, नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदीप कटकुरवार, तुषार निकुरे आदी उपस्थित होते.
अंकित अरोरा यांच्याबद्दल माहिती देताना डॉ. कुंभारे म्हणाले की, सायकलच्या माध्यमातून भारतभर फिरत अंकित अरोरा भारतीय संस्कृती, ग्रामीण चालीरीती, रूढी-परंपरा, ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था, व्यसनमुक्त समाज, आदिवासी जीवन आदींचा अभ्यास करीत आहेत. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य व विचारांविषयीही जाणून घेतल्याचे सांगितले. अरोरा यांनी आतापर्यंतच्या भारतभ्रमणादरम्यान आलेले अनुभव कथन करताना सांगितले की, 27 ऑगस्ट 2017 पासून सायकलने भारत भ्रमंती सुरू केली. राजस्थानपासून त्यांनी आतापर्यंत दिल्ली, हिमाचल प्रदेश, लडाख, पंजाब, हरियाना, गुजरात, गोवा, तमिळनाडू अशा विविध 15 राज्यांमधील विविध गावांमध्ये, शहरांमध्ये दौरा केला. त्यांनी आतापर्यंत 15 राज्यांतील 600 कुटुंबांसोबत वास्तव्य केले. त्यानंतर मार्च 2019 मध्ये ते महाराष्ट्रात दाखल झाले. या काळात त्यांनी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये थांबून ग्रामीण संस्कृती, व्यवसाय, राहणीमान अशा अनेक गोष्टी जाणून घेतल्या. शेतकऱ्यांसोबत त्यांनी शेतात कामसुद्धा केले. शुक्रवारी अंकित अरोरा गडचिरोलीत दाखल झाले. त्यांनी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेला भेट देऊन वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या ध्यान, प्रार्थना, रामधून, भजन या उपक्रमात सहभाग घेतला. त्यांनी कुरखेडा तालुक्‍यातील आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेला भेट देऊन संस्थेची कार्यपद्धती जाणून घेतली. तसेच धानोरा तालुक्‍यातील मेंढालेखा येथेही भेट देऊन आदिवासी संस्कृतीची ओळख करून घेतली. त्यांच्या यात्रेचा आतापर्यंत 780 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांनी बी. कॉम.पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. काही वर्षे नोकरी केल्यानंतर पत्रकारिताही केली. त्यानंतर त्यांनी भारत भ्रमंतीला सुरुवात केली. लांब पल्ला गाठण्यासाठी कधी-कधी एका दिवसात 300 ते 400 किमी सायकलने प्रवास करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
आज घेणार डॉ. आमटेंची भेट
अंकित अरोरा रविवारी (ता. 20) भामरागड तालुक्‍यातील हेमलकसा येथील ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देणार आहेत. याठिकाणी काही दिवस थांबून प्रकल्पाची माहिती जाणून घेणार आहेत. दक्षिण भारतात फिरताना तेथील शैक्षणिक प्रयोगांचा चांगला अनुभव मिळाल्याचे ते म्हणाले. श्रीगुरुदेव सेवा मंडळाद्वारे संचालित अड्याळ टेकडी येथेही त्यांनी काही दिवस वास्तव्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT