file photo
file photo 
विदर्भ

शहरासह ग्रामीण भागात खुलेआम डान्सबार सुरू!

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून नागपूर शहरासह ग्रामीण भागात अनेक बारमध्ये खुलेआम डान्सबार सुरू आहेत. बारमधील गुंडगिरी प्रवृतीचे युवक बारबालांशी अश्‍लील चाळे करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. अशा डान्सबारला राजकीय आणि पोलिसांचे पाठबळ असल्याची चर्चा शहरात आहे.
नागपूर जिल्ह्यात (शहर आणि ग्रामीण दोन्ही क्षेत्रांत) एकाही डान्स बारला परवानगी नसताना जिल्ह्यात काही ठिकाणी तसेच शहरात काही ठिकाणी डान्सबार राजरोसपणे सुरू असल्याचे आणि त्यामध्ये डान्स करणाऱ्या बारबालासोबत अश्‍लीलता सुरू असल्याचे समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी परिसरात एका बारमध्ये नियमबाह्य पद्धतीने डान्स बार सुरू असल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओवरून समोर आले आहे. या बारमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून बारबालांवर नोटा उधळल्या जातात तर काही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांकडून बारबालांशी अश्‍लील चाळे करीत असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बारच्या आत काही लोक बेभान होऊन नाचत आहेत तर काही जण बारबालांवर नोटा उधळत आहेत. विशेष म्हणजे शहर आणि जिल्ह्यात फक्त आर्केस्ट्रा म्हणजेच गाण्याच्या कार्यक्रमाची परवानगी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने केवळ संगीताच्या कार्यक्रमाला परवानगी दिली आहे. मात्र, येथे मध्यरात्रीनंतर खुलेआम डान्स बार सुरू असल्याची माहिती आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT