Death by crushing a motorcycle in an accident
Death by crushing a motorcycle in an accident sakal
विदर्भ

विचित्र अपघातात मोटार सायकल स्वराचा चिरडून मृत्यू

सुधीर कोरे

जेवळी (ता. लोहारा) : पुढून येणाऱ्या भरधाव वाहनास क्रॉस करताना हेड लईटच्या प्रकाश झोताने अंदाज न आल्याने रस्त्याच्या बाजूने जात असलेल्या गाईला धडक लागून रस्त्यावर पडलेल्या त्या मोटरसायकल स्वाराच्या अंगावरून पिकप (टेम्पो) वाहन गेल्याने  युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघात नंतर मात्र संबंधित अज्ञात टेम्पो चालकाने टेम्पो न थांबता अपघात स्थळावरून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला आहे. हा विचित्र अपघात शुक्रवारी (ता.२१) संध्याकाळी साडेसात वाजता जेवळी (ता लोहारा) गावाजवळ घडले आहे.(Death by crushing a motorcycle in an accident)

याबाबत माहिती अशी की, हिप्परगा (सय्यद ता. लोहारा) येथील शौकत इस्माईल कारभारी (वय २५) हे शुक्रवारी (ता २१) संध्याकाळी कामानिमित्त मोटरसायकल (क्र. एम एच १३ सी आर- ११९८) वरून जेवळीला जात होते. जेवळी गावाजवळील समृद्धी धाब्या समोर जेवळीकडू लोहराकडे जाणाऱ्या भरधाव पिकप टेम्पोला क्रॉस करताना या टेम्पोच्या हेडलाईटच्या प्रकाशाने अंदाज न आल्याने या रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या गाईला जोरदार धडक बसली. यात मोटरसायकल सॉर उडून रस्त्यावर पडला. या वेळी टेम्पो चालकांला वेगावर नियंत्रण ठेवता आला न आल्याने हा भरधाव टेम्पो त्या युवकाच्या अंगावरून गेला.

यात चिरडून मोटरसायकल स्वार शौकत कारभारी या युवकाचे जागीच मृत्यू झाला आहे. या विचित्र अपघात नंतर मात्र संबंधित अज्ञात टेम्पो चालकाने टेम्पो न थांबता अपघात स्थळावरून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला. या अपघातात धडकेने गाईचाही ही पाय मोडला आहे. मयत शौकत कारभारी हे पदवीधर असून नोकरीच्या शोधात होते. दोन वर्षापूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. शौकत हे हिप्परगा सय्यद येथील माजी उपसरपंच इस्माईल कारभारी यांचा मुलगा होत. त्यांच्या अशा अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT