train
train 
विदर्भ

रेल्वे प्रवासाला निघालात, शेजारीच असू शकतो चोर

सकाळ वृत्तसेवा

अकोला ः साप्ताहिक आणि हॉली डे रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना लुटून लाखोंचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास रेल्वे पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. ही कारवाई रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता.12) केली. आरोपीकडून तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील वाशीम बायपास परिसरातील रूपचंद नगरातील रहिवासी असलेला नागसेन महादेव खंडारे (वय 30) हा अकोला रेल्वे स्थानकावरून मध्यरात्री दरम्यान साप्ताहिक आणि हॉली डे अशा विशेष रेल्वेमध्ये रिझर्व्हेशनचे तिकीट काढून बसायचा. रात्रीच्या दरम्यान प्रवासी झोपलेले असताना पाहून त्यांच्या बॅग लंपास करायचा. मागील काही दिवसांपूर्वी शालीमार एक्स्प्रेसमध्ये झालेल्या चोरीच्या प्रकरणातही नागसेन खंडारे याचा समावेश होता.

वाढत्या चोऱ्यांचे सत्र लक्षात घेता, जीआरपी पोलिसांनी या आरोपीला अटक करण्याचा चंग बांधला होता. त्यावरूनच या आरोपींवर पाळत ठेवण्यात आली. त्याचे सीसीटीव्ही फुटेज गोळा करून सर्वच रेल्वेस्थानक पोलिसांना देण्यात आले होते. अशातच अकोल्यातील हा अट्टल चोरटा नागसेन खंडारे याला मंगळवारी सकाळी साडेपाच वाजता भुसावळ येथून शालिमार एक्सप्रेसमध्ये बसताना पाहण्यात आले. त्याला अटक करून त्याची विचारपूस केली असता, त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली‌.

चोरीतील साहित्याची विचारपूस केली असता त्याने ती अकोला येथील आपल्या राहत्या घरी असल्याचे सांगितले. त्याला अकोला आणून त्याच्या घराची झडती घेतली असता,त्याच्याकडे रेल्वे पोलिसांना पाच बॅग, साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, बारा हजार रुपये किंमतीची एक सोन्याची चैन, आणि तोरड्याचा जोड असा एकूण दोन लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या कारवाईमुळे भविष्यात होणाऱ्या मोठ्या चोऱ्यांचे सत्र थांबणार असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली आहे‌‌.

या अधिकाऱ्यांनी केली कारवाई
ही कारवाई वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त ए.पी. दुबे यांनी गठीत केलेली सी.पी.पी.एस. समिती तीन सहाय्यक उपनिरीक्षक, एन.एस.जगताप, सहाय्यक उपायुक्त प्रल्हाद सिंह,आरक्षक नीलेश वानखडे, मोहसीन शेख, विनोद कुमार, सिंटू कुमार, पंकज गवई, यांनी केली. अशी माहिती रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक विशेष नागर यांनी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

DC vs MI, IPL : दिल्लीकडून आजपर्यंत कोणालाच जमला नव्हता, तो विक्रम फ्रेझर-मॅकगर्कने एकदा नाही तर दोनदा करून दाखवला

Fact Check : चीनमधला पूल मुंबईचा सांगून '४०० पार' चा दावा; फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update: भाजप -एनडीए 2-0 ने आघाडीवर; कोल्हापुरात पीएम मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

SCROLL FOR NEXT