विदर्भ

निवडणुकीच्या भत्त्यापासून अधिकारी वंचित

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला; परंतु अद्याप लोकसभेतील कामाचा भत्ता अधिकाऱ्यांना मिळाला नाही. यामुळे अधिकारी वर्गात नाराजीचा सूर आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने भत्त्याचा निधी दिला असून, निवडणूक विभागात पडून आहे. निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांमुळे भत्ता मिळाला नसल्याचे सूत्रांकडून समजते.

नागपूर जिल्ह्यात रामटेक आणि नागपूर अशा दोन लोकसभेच्या जागा आहेत. एप्रिल महिन्यात निवडणूक झाली होती. तर मे महिन्यात निकाल जाहीर करण्यात आला होता. या निवडणुकीच्या कामात 28 हजारांवर अधिकार, कर्मचाऱ्यांनी नियुक्ती करण्यात आली होती. निवडणुकीच्या कामात विविध विभागांतील वर्ग 1 व 2च्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून हा वर्ग कामात होता. निकाल लागेपर्यंत यांनी नियुक्ती होती. जवळपास तीन महिने हे अधिकारी निवडणुकीच्या कामात होते. यांना नियमानुसार एक महिन्याच्या पगाराएवढा निवडणुकीचा भत्ता देण्यात येतो. मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी कामाचा भत्ता देण्यात आला. तर, निवडणूक कार्यात असलेल्या इतर कर्मचाऱ्यांनाही भत्ता देण्यात आला. मात्र, अद्याप अधिकारी वर्गाला हा देण्यात आलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक आयोगाने महिन्याभरापूर्वीच आवश्‍यक निधी जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या खात्यात वळता केला. भत्त्याचा निधी अधिकाऱ्यांना देण्यासाठी संबंधित फाइलही तयार करण्यात आली. मात्र, त्यावर अद्याप वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वाक्षरीच करण्यात आली नसल्याची माहिती आहे. यामुळे अधिकाऱ्यांना निवडणूक भत्ता मिळाला नाही. आता पुन्हा विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. परंतु, लोकसभेचा भत्ताच न मिळाल्याने त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT