File photo
File photo 
विदर्भ

मंत्रिपदावरून विदर्भात चर्चेचे गुऱ्हाळ | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

नागपूर :विदर्भातील 62 जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. भाजपने 15 जागा गमावून 29 जागांवर विजय मिळविला. त्यांचा मित्रपक्ष शिवसेनेला चार जागा मिळाल्या आहेत. युतीचे सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन करेल, हे सांगायची गरज नाही. निवडून आलेल्या आमदारांना आता मंत्रिपदाचे डोहाळे लागले आहेत.
मुख्यमंत्री नागपूरचा असल्याने विदर्भातील आमदारांनी मंत्रिपदासाठी सेटिंग सुरू केली आहे. गेल्या वेळी गोंदियातून राजकुमार बडोले यांना कॅबिनेट पदाची बढती मिळाली होती. त्यानंतर परिणय फुके यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती. परंतु, यावेळी दोन्ही नेत्यांचा दारुण पराभव झाला आहे. मात्र, परिणय फुके हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार असल्याने त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्‍यता आहेत. तर तिरोड्‌याचे आमदार विजय रहांगडाले यांचे नाव सुद्धा सध्या चर्चेत आहे. चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार हे मंत्रिमंडळात राहतील. तर यवतमाळ जिल्ह्यातील भाजपचे मदन येरावार, प्रा. उईके, आणि शिवसेनेचे संजय राठोड हे पुन्हा मंत्री राहतील, यावर चर्चा सुरू आहे. शिवसेनेकडून संजय राठोड यांच्या बढतीचे संकेत आहेत. त्यांना कॅबिनेट मिळण्याची शक्‍यता आहे. तर आदिवासी मंत्री म्हणून प्रा. उईके यांची वर्णी लागू शकते. अमरावती जिल्ह्यात भाजपचे अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप अडसड निवडून आले आहेत. ते नव्या दमाचे असल्याने त्यांना संधीची आशा आहे. वर्धा येथून पंकज भोयर, समीर कुणावार आणि दादा केचे निवडून आले आहेत. यातील पंकज भोयर आणि समीर कुणावार यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो. नागपूर जिल्ह्यातून समीर मेघे यांच्यासाठी संधी आहे.
गेल्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समोवश होता. एवढेच नव्हेतर ऊर्जा, कामगार यासारखे महत्त्वाचे खातेही त्यांच्याकडे होते. तर भंडारा, वर्धा आणि नागपूर जिल्ह्याचे ते पालकमंत्रीही होते. यावेळेस त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांच्याऐवजी समीर मेघे यांना मंत्रिमंडळात घेतील, अशी चर्चा आहे. तर गडचिरोली जिल्ह्यातील अम्ब्रीशराव आत्राम यांचा पराभव झाल्याने त्यांच्या ऐवजी देवराव होळी किंवा कृष्णा गजबे यांच्यापैकी एकाच्या नावाचा विचार होऊ शकतो. तर बुलडाणा जिल्ह्यातून आकाश फुंडकर यांची चर्चा आहे. तर अकोला येथून गोवर्धन शर्मा, प्रकाश भारसाकडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकतो. वाशीममधून लखन मलिक यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. तर संजय कुटे हे कामगारमंत्री होते. त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT