divisional commissioner order to decrease death toll of corona patients in yavatmal 
विदर्भ

विभागात यवतमाळचा मृत्यूदर सर्वाधिक, उपाययोजना करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात मृत्यूचा आकडा चारपटीने वाढला आहे. शिवाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्यासुद्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. ही अतिशय गंभीर बाब असून जिल्ह्याचा मृत्यूदर व पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी गांभीर्याने तपासणी करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले आहे. ते गुरुवारी (ता. एक) जिल्हाधिकारी कार्यालयात कोवीड परिस्थितीचा आढावा घेताना बोलत होते. 

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार आदी उपस्थित होते. वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यूचे प्रमाण वाढण्यामागचे कारण आयुक्तांनी विचारले. अमरावती विभागात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत यवतमाळमध्ये मृत्यू जास्त होत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्‍टरांनी राज्याच्या टास्क फोर्ससोबत नियमित संपर्क ठेवावा. मृत्यू होत असलेल्या यवतमाळ, दिग्रस, दारव्हा, पुसद, महागाव, वणी, केळापूर आदी भागात सर्व्हेलन्स, टेस्टिंग आणि प्रतिबंधित क्षेत्राची सीमा वाढविण्याचे आदेश सिंह यांनी दिले. एक एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात लसीकरणाची गती अतिशय कमी आहे. पहिल्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्सचे केवळ 85 टक्‍केच उद्दिष्ट पूर्ण झाले. लसीकरणाची गती वाढविली नाही तर पाहिजे त्या प्रमाणात पुरवठा होणार नाही. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पालिका मुख्याधिकारी यांच्यासह संपूर्ण यंत्रणेला कामाला लावण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले. प्रतिबंधित क्षेत्रामधील प्रत्येक घराचा सर्वे होणे आवश्‍यक आहे. सोबतच घरातील प्रत्येक व्यक्तीची टेस्टिंग करावी. प्रतिबंधित क्षेत्राची सीमा निश्‍चित करून यातील घरांची संख्या वाढवा. जोपर्यंत जिल्ह्याचा मृत्यूदर कमी होत नाही व पॉझिटिव्हीटी दर पाचच्या खाली येत नाही, तोपर्यंत नियमितपणे तपासणी करण्याच्या सूचना केल्या.

तपासणीसाठी दोन मशीनची खरेदी -
तपासणीसाठी आणखी दोन नवीन मशीन घेण्यात येत आहे. तशी ऑर्डर देण्यात आली असून या दोन मशीन कार्यान्वित झाल्या तर दररोज साडेतीन ते चार हजार तपासणी होईल. पुढील 20 दिवसांत यवतमाळ शहरातील 45 वर्षे वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नवीन लसीकरण केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs MI Live: ना तुला, ना मला... दीपक चहर अन् रॉबिन मिंझ यांची 'पाकड्यां'सारखी फिल्डींग; हार्दिक पांड्यावर तोंड लपवण्याची वेळ Video

KKR vs MI Live: दीपक चहरने कोलकाताच्या फॅन्सना डिवचले; Finn Allen ची विकेट, सूर्याला थांब म्हणाला अन् पुढे काय केले ते पाहाच Video

Tamil Nadu Politics: तमिळनाडू सरकार अडचणीत? राष्ट्रपती राजवटीची मागणी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, प्रकरण काय?

Konkan Tourism : तारकर्लीत ‘आयएनएस गुलदार’चे पाण्याखालील संग्रहालय; नियंत्रित जलसमाधीमुळे कोकण पर्यटनाला नवी ओळख

NEET Paper Leak : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर पुण्यातील आरसीसी मोटेगावकर क्लासला महापालिकेची टाळेबंदी

SCROLL FOR NEXT