ज्योती गडरिये
ज्योती गडरिये  
विदर्भ

दिव्यांग ज्योतीची आंतरराष्ट्रीय रोईंगसाठी निवड 

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : असाध्य गोष्ट साध्य करण्यासाठी शारीरिक क्षमतेपेक्षा मानसिक बळाची गरज अधिक असते, याची प्रचीती अनेक दिव्यांग खेळाडूंनी आपल्या कामगिरीतून सिद्ध केली आहे. अपघातात एक पाय पूर्णपणे गमावलेल्या ज्योती राधेश्‍याम गडरिये या दिव्यांग मुलीची आंतरराष्ट्रीय रोईंग (नौकायन) स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कोरिया येथे 23 व 27 ऑक्‍टोबरपर्यंत होणाऱ्या एशियन रोईंग स्पर्धेत ज्योती सहभागी होणार आहे. यासाठी तिला सैन्यदलात कार्यरत असणारे प्रशिक्षक विकल सार्वे यांचे मार्गदर्शन लाभले. 
ज्योती गडरिये भंडारा जिल्ह्यातील डोंगरगाव या छोट्याशा गावातील आहे. 2016 मध्ये ज्योतीचा अपघात झाला. या अपघातात दुर्दैवाने तिला आपला डावा पाय गमवावा लागला. एक पाय पूर्णपणे निकामी झाल्याने उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या ज्योतीला नैराश्‍याचा सामना करावा लागला. परंतु, तरीही ती खचली नाही. नव्या उमेदीने आपल्या जीवनातील अंधार परतवून लावण्यासाठी तिने संघर्ष करायला सुरुवात केली. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची व हलाखीची असल्याने तिच्यासमोर खूप अडचणी होत्या. फेसबुकच्या माध्यमातून ज्योती प्रशिक्षक विकल सार्वे यांच्या संपर्कात आली. विकल सार्वे हे उत्कृष्ट नौकायनपटू असून भंडारानजीकच्या कोरंभी येथील रहिवासी आहेत. चार वर्षांपासून ते सैन्यदलात कार्यरत असून नौकायनपटूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या प्रशिक्षणात तयार झालेल्या नौकायनपटूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ज्योतीने विकल यांच्याशी चर्चा करून आपबीती सांगितली. तिला रोईंगचे प्रशिक्षण देण्याबाबत विनंती केली. विकल सार्वे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी करून याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी संमती दिल्यानंतर ज्योती तिथे पोहोचली. 10 मेपासून "आर्मी रोईंग नोड'मध्ये तिचे प्रशिक्षण सुरू झाले. सहा महिन्यांच्या अल्प कालावधीत कठोर परिश्रम करून ज्योती ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली. तिने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक विकल सार्वे, संदीप चहल व सहप्रशिक्षकांना दिले आहे. जिल्हा रोविंग असोशिएशनचे अध्यक्ष जॅकी रावलानी, उपाध्यक्ष मंगेश वंजारी, सचिव राजू चोपकर, हितेश सार्वे, आशीक चुटे, अनिल कारेमोरे यांनी या निवडीबद्दल ज्योतीचे अभिनंदन केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT