Dogs are eating green plants during lockdown 
विदर्भ

लॉकडाऊनमुळे कुत्र्यांवर आलीय हिरवा पाला खाण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : मुक्‍या जनावरांनासुद्धा माणसांप्रमाणेच अन्न, पाण्याची गरज असते. मानव बोलून संवेदना व्यक्त करू शकतो. मात्र, मुके प्राणी विविध हालचालीतून आपल्या भावना व्यक्त करतात. कुत्रा हा प्राणी माणसाचा हुशार मित्र आहे. तसेच तो माणसाच्या कृतीचे अनुकरण करत असतो. माणसाचे अवलोकन करून जनावरेसुद्धा अशीच कृती करत असल्याचे जाणवत आहे. लॉकडाऊनचा परिणाम म्हणून कुत्रे आता झाडांचा पालापाचोळा खाऊन जीवन जगत आहेत.

जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्यामुळे हॉटेल बंद, मटण, मासोळीची दुकाने शहराच्या बाहेर गेली आहे तसेच नागरिकांनी घरातील शिळे अन्न बाहेर फेकणे बंद केले आहे. त्यामुळे मोकाट कुत्र्यांवर उपासमारीची वेळ आली. परिणामी, अन्न, पाण्याविना एका कुत्र्याचा मृत्यू झाला. आपला बांधव मेलेला बघून एक-एक करता अख्खे दहा ते बारा कुत्रे एकत्र येऊन त्यांनी त्या कुत्र्यावर अंत्यसंस्कार करून मुके जनावरे असलो तरी आमच्या भावना, संवेदना माणसाप्रमाणेच आहेत, हे दाखवून दिले.
लॉकडाऊन असल्याने अनेक ठिकाणी कुत्र्यांवर उपासमारीची पाळी आली आहे. आता कुत्रे अन्नाऐवजी झाडांचा पालापाचोळा खाऊन आपली भूक मिटविण्याचे प्रयत्न करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी राहुल मेश्राम यांनी सांगितले. चक्क तीन ते चार कुत्रे हे आंबेडकर वॉर्डातील एका झाडाचा पाला खाताना एक दिवस नाही तर चक्क दहा दिवस दिसले. यामुळे आता कुतुहल निर्माण झाले आहे.

भुकेमुळे ही कृती
शरीरातील एखादा घटक द्रव्य कमी झाला की, कुत्रे दगडाला चाटतात किंवा उलटी करायची झाल्यास गवत खातात. मात्र, एकापेक्षा अधिक कुत्रे झाडांची पाने खातात. हा केवळ लॉकडाउनचा परिणाम असू शकतो.
- डॉ. गुणवंत भडके
पशुधन विकास अधिकारी, लाखनी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ESMA Act : भारत सरकारने गॅस तुटवड्यामुळे लागू केला एस्मा कायदा, LPG वितरणावर राहणार नियंत्रण, साठेबाजांची खैर नाही

पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, २२ महिन्यांनी जामीन मंजूर

Latest Marathi News Live Update : युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, मुंबईत भाजीपाला स्वस्त

विम्याच्या पैशांसाठी अपघाती मृत्यूचा बनाव, मृतदेहाशिवाय शवविच्छेदन अहवाल अन् FIR; पत्नीसह डॉक्टर आणि ४ पोलिसांना अटक

BCCI Rewards T20 WC Champions: वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय संघाला १३१ कोटींचं बक्षीस; सूर्याची टीम झाली मालामाल

SCROLL FOR NEXT