file photo
file photo 
विदर्भ

डॉन आंबेकरच्या भाच्याला अटक 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : गुजरातच्या व्यापाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी तसेच पाच कोटींनी फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात डॉन संतोष आंबेकरचा भाचा नीलेश केदार याला गुन्हे शाखा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. डॉन संतोष आंबेकरला अटक केल्यानंतर आता त्याचा "राईट हॅंड' नीलेशलाही अटक करण्यात आली. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मालाड येथील भूखंड खरेदी करण्यासाठी गुजरात येथील कारखानदार जिगरभाई पटेल यांनी संतोष आंबेकरसोबत 10 कोटींत सौदा केला होता. पटेल यांनी हवालमार्फत 5 कोटी रुपये मुंबईला पाठविले होते. याप्रकरणातील मध्यस्थ नाशिकचा रमेश पाटील, मुंबईचा भैयाभाई आणि नागपूरचा सलीम ऊर्फ राजपूत हे होते. पैसे पाठवूनदेखील प्लॉटचा विक्री करारनामा न केल्याने पटेलने दलाल रमेश पाटील याची भेट घेतली. दरम्यान, रमेशने माझा मोबाईल बंद असून संतोषसोबत बोलायचे आहे असे सांगून पटेलचा मोबाईल घेतला. त्याच मोबाईलवरून त्याने हवाला कर्मचाऱ्याला फोन करून पैसे देण्यास सांगितले. रमेशने पाच कोटींची उचल केली. पाच कोटी रुपये आल्यानंतर संतोष आंबेकरचा भाचा नीलेश केदार याने मुंबईहून पैसे आणले होते. त्यामुळे पोलिसांनी नीलेशलादेखील अटक केली.
घराची झाडाझडती 
झोपडपट्‌टीतील डॉन संतोष आंबेकर याला अटक केल्यानंतर त्याच्या घराची गुन्हे शाखेच्या पथकाने झाडाझडती घेतली. त्यांच्या घरातून गुजरातच्या व्यापाऱ्यांची फसवणूक करण्यात आलेल्या भूखंडाची बनावट कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली. रविवारी दुपारी डॉन संतोष आंबेकरच्या हातात बेड्या ठोकून त्याची रस्त्याने वरात काढत न्यायालयात पोलिसांनी हजर केले. लगेच गुन्हे शाखेने आंबेकरच्या घराची झडती घेतली. घरातून भूखंडाची बनावट कागदपत्रांसह अनेक जमिनी बळकावल्याचे दस्तऐवजही मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

SCROLL FOR NEXT