anil-deshmukh-new.jpg 
विदर्भ

पालघर प्रकरणी काय म्हणले गृहमंत्री देशमुख वाचा....

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाचे संकट घोंघावत असतानाच पालघरमध्ये जमावाकडून तीन जणांची हत्या करण्यात आली. ही घटना दुर्दैवी आहे. परंतु या प्रकरणी आता राज्यात राजकारण करण्यात येत आहे. या घटनेवरुन विरोधकांनी राज्य सरकावर टीका करण्यास सुरुवात केली आहे, ही बाब अत्यंत वाईट आहे. संकटाच्या या काळात पालघर प्रकरणाचं राजकारण करु नये असं आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (ता. 20) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केलं. पालघर मॉब लिंचिंग (झुंडबळी) प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्यात आला आहे. या प्रकरणी 101 लोकांना अटक सुद्धा करण्यात आली आहे, अशी माहिती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. 

पालघर जिल्ह्यातील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. 16) रोखलं होतं. वाहनात बसलेले लोकं हे मुलांना उचलणारे, चोर दरोडेखोर समजून ग्रामस्थांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. जमावाने केलेल्या हल्ल्यात कांदिवली येथील सुशीलगिरी महाराज, वाहन चालक निलेश तेलगडे आणि नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिराचे पुजारी कल्पवृक्षगिरी महाराज यांचा मृत्यू झाला होता. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने त्यांनी असा प्रकार केला. परंतु या प्रकरणी आता राजकारण करण्यात येत आहे, असा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांवर लागला.

सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असून प्रकरण सीआयडीकडे देण्यात आल्याची माहिती सुद्धा यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पत्रकार परिषदेला केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे, आमदार रणधिर सावरकर, गोवर्धन शर्मा, हरिश पिंपळे, नितीन देशमुख, प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलिस अधीक्षक अमोघ गांवकर व इतर अधिकारी उपस्थित होते. 

जमातींना वसईत परवानगी नाकारली
निजामुद्दीन येथील मरकज प्रमाणे तबलिगी जमातच्या नागरिकांनी मुंबई येथील वसईमध्ये 15 व 16 मार्च रोजी संमेलन आयोजित केलं होतं. संमेलनात 50 हजार नागरिक येणार होते. आयोजकांनी पोलिसांकडे 22 जानेवारीरोजी अर्ज सुद्धा केला होता. संबंधित अर्ज 5 फेब्रुवारीरोजी मंजूर सुद्धा करण्यात आला होता. परंतु त्यानंतर राज्यावर कोरोनाचे संकट ओढावल्यामुळे तबलिगी समाजाला संमेलन घेण्यास परवानगी नकारण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देशमुख यांनी यावेळी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT