Amte Family
Amte Family 
विदर्भ

डॉ. आमटे दाम्पत्याचा "जीवनगौरव'; आज दिल्लीत सत्कार 

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना आज, रविवारी दिल्ली येथे "लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड' अर्थात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गेल्या चार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांची आरोग्यसेवा करतानाच त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी कार्य करण्यासाठी हा पुरस्कार बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्‌स यांच्या हस्ते मिळणार आहे. 

बिल गेट्‌स देणार पुरस्कार 
आमटे दाम्पत्य गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यात कार्यरत आहेत. आदिवासींच्या सेवेबद्दल त्यांना आजवर अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना "रॅमन मॅगसेसे' पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. आज, रविवारी त्यांना बिल ऍण्ड मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनचे उपाध्यक्ष बिल गेट्‌स यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार त्यांना नवी दिल्लीतील आयसीएमआर हॉल येथे आयोजित सोहळ्यात बहाल करण्यात येणार आहे. 

इतरही सत्कारमूर्ती 
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांच्या वतीने आरोग्य सेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार आहे. यात डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह डॉ. सायरस पूनावाला व डॉ. किरण मजुमदार-शॉ यांचाही समावेश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT