File photo
File photo 
विदर्भ

डॉ. काणेंच्या "प्रोबॅबिलिटी थेअरी'वर रेल्वेची मोहर

मंगेश गोमासे

नागपूर : रेल्वेचे तिकीट काढताना ते कन्फर्म होईल काय, याचीच चिंता प्रवाशांना असते. ही माहिती तिकिटाच्या बुकिंगदरम्यान कळावी यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने प्रकल्पावर संशोधन केले होते. या संशोधनात मांडलेल्या "प्रोबॅबिलिटी थेअरी'वर रेल्वेनेही मोहर उमटवली आहे. डॉ. काणेंचा हा प्रकल्प रेल्वेने एका वर्षापूर्वीच स्वीकारून तिकिटांवर कन्फर्मेशनची टक्केवारी देण्यास सुरुवात केली आहे.
देशात दररोज लाखो नागरिक रेल्वेच्या तिकिटांसाठी रांगेत उभे राहतात. हजारो प्रवाशांचे तिकीट वेटिंगवरच असते. याचा त्रास प्रत्येकालाच होत असतो. हा त्रास कमी करण्यासाठी डॉ. काणे यांनी केंद्राच्या सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजी विभागामार्फत प्रकल्प हाती घेतला. रोज किती आरक्षित तिकिटे विकली जातात, यापैकी किती रद्द होतात, याची सरासरी आकडेवारी कुलगुरूनी गोळा केली. यावर सुमारे अडीच वर्षे संशोधन केले. या आकडेवारीचा आधार घेऊन वेटिंगवरील सरासरी किती तिकीट कन्फर्म होतात, याचा अभ्यास केला. यावरून त्यांनी "प्रोबॅबिलिटी थेअरी' मांडली. यामुळे तुम्ही काढलेले वेटिंगवरील तिकीट कन्फर्म होईल किंवा नाही, हे समजू शकते. या थेअरीच्या माध्यमातून रेल्वेची प्रतीक्षायादी तपासण्याची गरज भासणार नसल्याचे त्यांनी सिद्ध केले. तिकीट कन्फर्म होणारच नसेल, तर लगेच ते रद्द करून इतर गाडीचे आरक्षण करता येऊ शकेल ही बाब मांडली. या संशोधनाला त्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडे सादर केले. त्यानंतर रेल्वेने त्याचे महत्त्व ओळखून त्यास आत्मसात केले. गेल्या वर्षभरापासून सातत्याने रेल्वेचे तिकीट काढताना, ते कन्फर्म होईल की नाही, याबद्दल टक्केवारी देण्यात येते. डॉ. काणेंच्या संशोधनामुळे हे शक्‍य झाले असल्याचे समजते.

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने केलेल्या संशोधन रेल्वेने आत्मसात केले. हे त्या संशोधनाचे फलित आहे. याचा फायदा सामान्य नागरिकांना रेल्वेच्या माध्यमातून झाला याचा विशेष आनंद आहे.
-डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT