knife attack
knife attack sakal media
विदर्भ

वर्धा : न्यायाधीशांसमोर साक्षीदार महिला वकिलावर चाकूहल्ला

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : दाखल प्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू असताना आरोपीने थेट न्यायाधीशासमोर साक्षीदार महिला वकिलावर चाकूहल्ला केला. या घटनेने न्यायालय परिसरात चांगलीच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (ता. २२) दुपारच्या सुमारास जिल्हा न्यायालयात घडली.

या प्रकरणात जखमी झालेल्या महिला वकिलाचे नाव योगिता मुन असे असून तिला उपचाराकरिता सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी भीम गोविंद पाटील (वय ८३) याला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भीम गोविंद पाटील याच्यावर पुलगाव येथे खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा नोंद आहे. याच प्रकरणात वर्धा न्यायालयात आरोपीची पेशी होती. तर तक्रारकर्ता वकील योगीता मुन यांची या प्रकरणात साक्ष होती. त्यांची साक्ष सुरू पाठिमागून येत भीम पाटिल याने चाकूहल्ला केला. यात योगिता मून गंभीर जखमी झाल्या.

यावेळी पळण्याच्या तयारीत असलेल्या आरोपील येथील काही नागरिकांनी पकडले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले. जखमी महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

न्यायालयात चाकू आल्याने सारेच अवाक्

सर्वोच्च व्यवस्था असलेल्या न्यायालयात आरोपी चाकू घेऊन गेल्याने सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे येथे सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात उपाययोजना आखण्या संदर्भात मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात तत्काळ वकीलांची बैठक बोलावण्यात आली. यात न्यायालयात प्रवेश करणाऱ्या प्रवेश द्वारावर चेकींग पॉइंट लावण्याची मागणी करण्यात आल्याचे सागंण्यात येत आहे.

वकील महिलेवर न्यायालयात चाकुहल्ला केल्या प्रकरणी भीम गोविंद पाटील या आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकणी चौकशी सुरू असून महिलेच्या तक्रारी वरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

- सत्यवीर बंडीवार, ठाणेदार शहर पोलिस ठाणे वर्धा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पूर आणि पावसामुळे विध्वंस, 57 हून अधिक मृत्यू आणि हजारो बेपत्ता

Kshitij Zarapkar: अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

SCROLL FOR NEXT