file photo
file photo 
विदर्भ

आर्थिक गुन्हेशाखेची शेगाव, पुण्यात झडती

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : समन्वयीत कृषी विकास प्रकल्प (केम) मधील सहा कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश चौधरीला जिल्हा न्यायालयाने शुक्रवारपर्यंत (ता. 27) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोमवारी (ता. 23) दिले.
आर्थिक गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वातील एक पथक मंगळवारी (ता. 24) चौधरीला घेऊन चौकशी करण्यासाठी शेगाव व पुण्याकडे रवाना झाले आहे. केम प्रकल्प अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, अकोला या पाच जिल्ह्यासह वर्धा जिल्ह्यात सुद्धा राबविण्यात आला होता. त्यावेळी अमरावती विभागाची जबाबदारी चौधरी यांच्याकडेच असताना त्यांनी पदाचा दुरुपयोग करून रकमेची अफरातफर केल्याची बाब पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीअंती पुढे आले होती, पोलिसांनी चौधरीसह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अधिकाऱ्यांसह आर्थिक गुन्हेशाखेचे पथक झडती घेण्यासाठी पुणे, बुलडाणा जिल्ह्यात मंगळवारी (ता. 24) रवाना झाले. ज्या ठिकाणी प्रकल्प राबविला त्या ठिकाणच्या काही लाभार्थ्यांसोबत किंवा ज्या संस्थेच्या वतीने कामे झाली, असे सांगितल्या गेले अशा लोकांशी, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे बयाण तपास यंत्रणेकडून नोंदविल्या जाईल.
गणेश चौधरीने सोमवारी (ता. 23) आर्थिक गुन्हेशाखेच्या पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT