file photo
file photo 
विदर्भ

शिक्षणमंत्र्यांना पडला विसर

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूर विभागीय उपसंचालक पदाच्या नियुक्तीवरून निर्माण झालेला तिढा अधिक वाढत आहे. खुद्द शिक्षणमंत्री ऍड. आशीष शेलार यांनी डॉ. शिवलिंग पटवे यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. दोन दिवसांत या आदेशावर निर्णय घेऊ असे आश्‍वासन दिले असताना, दहा दिवस उलटले असतानाही त्यावर कुठलीच कारवाई मंत्र्यांकडून झाली नसल्याने त्यांच्या भूमिकेवरच आता प्रश्‍नचिन्ह निर्माण होतो आहे. विशेष म्हणजे पत्रासाठी प्रस्ताव आयुक्तालयात गेल्यानंतरही असा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचे उपायुक्त राजेंद्र गोधने यांनी सकाळशी बोलताना सांगितले.
शालेय शिक्षण विभागात मोठे फेरबदल करण्यात आले. पाच ऑगस्टला प्रभारी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे यांना हटवून माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. शिवलिंग पटवे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने काढला. मात्र, मंत्रालयातून आदेश आल्यानंतरही निवडीचे साधे पत्र आयुक्तांनी काढले नाही. विशेष म्हणजे पदनामावलीत कनिष्ठ असताना, पुन्हा डॉ. पटवेंना डावलून त्यांना उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर पाच ऑगस्टला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून डॉ. पटवे यांच्याकडे उपसंचालक पदाचा कार्यभार देण्याचे आदेश काढण्यात आले. एक साधे पत्र काढून डॉ. पटवेंकडे ती जबाबदारी देणे अपेक्षित होते. मात्र, आयुक्तांना संपर्क केला असता असा प्रस्ताव आलाच नसल्याचे आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले. शिवाय स्वत: शिक्षणमंत्र्यांनी दोन दिवसात यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. दोन दिवस सांगून दहा दिवसांपेक्षा अधिकचा कालावधी आता निघून गेला असताना, या विषयावर शिक्षणमंत्र्यांनी कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे दिसते. त्यामुळे नियुक्ती थांबविण्यासाठी राजकीय दबाव आहे काय? असा प्रश्‍न निर्माण होत असून शैक्षणिक वर्तुळात या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान आता या प्रकरणात शिक्षक आमदार नागोराव गाणार हे मंत्र्यांना प्रश्‍न विचारणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT