विदर्भ

झेपत नसेल, तर शिकू नको- विनोद तावडे

सकाळवृत्तसेवा

अमरावती : आर्थिक स्थिती नसलेल्या विद्यार्थ्यांना इच्छा असूनही उच्च शिक्षण घेता येत नाही; सरकार त्यांना मोफत उच्च शिक्षणासाठीची सोय उपलब्ध करून देईल काय? असा प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्याला तुला झेपत नसेल, तर तू शिकू नको. नोकरी कर, असे अफलातून उत्तर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले.

ही घटना अमरावतीतील शिवाजी शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात शुक्रवारी घडली. शिवाय या गोष्टीचे चित्रीकरण करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश मंत्र्यांनी दिल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंत्र्यांच्या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करत पोलिसांनी त्या विद्यार्थ्यास वाहनात डांबून ठेवले. मात्र, इतर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करताच त्याला सोडून देण्यात आले.

माणिकराव घवळे वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनासाठी शिक्षणमंत्री आले अमरावती येथे आले होते. मंत्र्यांचे भाषण संपल्यावर पत्रकारितेच्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्यांचे लक्ष वेधले. तेव्हा प्रशांत शिवा राठोड या विद्यार्थ्याने वरील प्रश्न विचारला. मात्र तावडे यांना तो रूचला नाही.

पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या प्रश्नोत्तराचे मोबाइलमध्ये शूटिंग करत होते. ही बाब लक्षात येताच तावडे यांनी शूटिंग बंद करण्यास आणि झालेले चित्रण डिलीट करण्यास सांगितले. परंतु युवराज मनोहर दाभाडे या विद्यार्थ्याचे रेकॉर्डिंग सुरूच होते. त्याला पुन्हा रेकॉर्डींग बंद करण्यास सांगण्यात आले; तथापि हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आम्ही पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत, असे बाणेदार उत्तर देत युवराजने शूटिंग सुरूच ठेवले. या प्रकारामुळे संतापलेल्या तावडे यांनी, या विद्यार्थ्याला अटक करा, असे आदेश पोलिसांना दिले. पोलिसांनी लगेच युवराजला वाहनात डांबून घेऊन जाऊ लागले. विद्यार्थी वाहनामागे धावत गेले. काही शिक्षकांनी तावडे यांनाही युवराजला सोडण्याची विनंती केली. मंत्र्यांचा ताफा गेल्यानंतर पोलिसांनी युवराजला पोलीस वाहनातून उतरवून दिले; परंतु त्याचा मोबाईल परत केला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT