file photo
file photo 
विदर्भ

29 हजारांवर जागा गळाल्या

मंगेश गोमासे

नागपूर  : अभियांत्रिकीच्या अभ्यासाला लागलेले ग्रहण यंदाही कायम असल्याने यंदा विविध शाखेच्या तब्बल साडेआठ हजार जागा रिक्‍त राहणार आहेत. मागील पाच वर्षांत राज्यभरातील विविध महाविद्यालयांनी जागांमध्ये कपात केली असून, ती जवळपास 29 हजार 451 आहे.
राज्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येते. मागील पाच वर्षांपासून सातत्याने रिक्त जागांचा आकडा वाढत आहे. परिणामी महाविद्यालयांकडून या जागा कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी विद्यापीठाकडे अर्ज करण्यात येत आहे. यंदा राज्यातून जवळपास दहा ते पंधरा महाविद्यालयांचे विविध शाखा बंद करण्याचे प्रस्ताव विद्यापीठांकडे दिसून येत आहेत. मात्र, पाच वर्षांचा विचार केल्यास जवळपास 29 हजार 451 जागा अभियांत्रिकी शाखेतून कमी झाल्याचे दिसते. 2015-16 मध्ये राज्यातील 376 महाविद्यालयात 1 लाख 64 हजार 832 जागा होत्या. मात्र, 2019-20 मध्ये 361 महाविद्यालयात फक्‍त 1 लाख 35 हजार 381 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
नागपूर विभागात 48 महाविद्यालयांमध्ये जवळपास 18 हजारांवर जागांचा समावेश आहे. मागील वर्षी अभियांत्रिकी शाखेत राज्यभरात जवळपास 74 हजारांवर जागा रिक्त होत्या. विभागात याची संख्या बारा हजारांवर होती. दरम्यान, यंदा जवळपास तीन महाविद्यालये बंद झाली असून, बऱ्याच शाखांमधील विद्यार्थी संख्या घटली आहे. शिवाय यंदा बारावीच्या निकालात 5 टक्‍क्‍यांहून अधिक घट झाल्याने रिक्त जागांची संख्या वाढणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.
पाच वर्षांत निम्मे प्लेसमेंट नाही
अभियांत्रिकीच्या रिक्त जागांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. याचे मुख्य कारण अंतिम वर्षात विद्यार्थ्यांना हवे ते प्लेसमेंट मिळत नाही. गेल्या पाच वर्षांत प्लेसमेंटचा विचार केल्यास 50 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले नाही. 2018-19 या काळात राज्यातील सर्वाधिक 31 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले. 2015 पासून जवळपास ऍव्हरेज 25 टक्केच विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाल्याचे दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT