नागपूर
नागपूर 
विदर्भ

शिष्यवृत्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा 

सकाळ वृत्तसेवा


नागपूर  : भटक्‍या विमुक्त जातीसाठी असलेल्या डॉ. आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी. अन्यथा 16 सप्टेंबर रोजी घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा भटक्‍या विमुक्त समाज बांधवांतर्फे बेलदार समाज संघर्ष समितीने दिला. या संदर्भातील निवेदन आज शुक्रवारी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांना देण्यात आले. 
राज्य शासनाने भटक्‍या विमुक्त समाजातील दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डॉ. आंबेडकर मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना या वर्षीपासून लागू केली. या योजनेंतर्गत पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार तर नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे. मात्र या योजनेची विदर्भात अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली नाही. त्यामुळे समाज बांधवांना या विषयाची अद्यापही माहिती झाली नाही. शाळा स्तरावर शिष्यवृत्ती फॉर्म जमा करण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट असल्याने भटके विमुक्त समाजातील विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची शक्‍यता बळावली आहे. यामुळे तातडीने या योजनेचा व्यापक प्रमाणात प्रसार करावा, शिष्यवृत्तीचे फॉर्म 15 सप्टेंबरपर्यंत उपलब्ध करून द्यावे व फॉर्म जमा करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबरपर्यंत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. समाजकल्याणने या शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून न दिल्यास घंटानाद आंदोलन करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र बढिये यांनी सांगितले. 

भटक्‍या विमुक्त प्रवर्गासाठी असलेल्या डॉ. आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्तीची तत्काळ प्रभावी अंमलबजावणी व प्रसार करण्यात येईल. या शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही याकडे विशेष लक्ष देऊ. 
डॉ. सिद्धार्थ गायकवाड, प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT