नागपूर : व्हीव्हीपॅट असलेल्या ईव्हीएमबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील व उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा.
नागपूर : व्हीव्हीपॅट असलेल्या ईव्हीएमबाबत माहिती देताना जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल. सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील व उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा.  
विदर्भ

व्हीव्हीपॅटची स्लीप दिसणार सात सेकंद

सकाळवृत्तसेवा

नागपूर : निवडणुकांमध्ये आता ईव्हीएमला व्हीव्हीपॅट लावण्यात येणार आहे. यामुळे मत कुणाला दिले याची खात्री होणार आहे. व्हीव्हीपॅटची मशीन असणार असून, फक्त सात सेकंदच स्लीप पाहता येणार आहे. त्यानंतर स्लीप संबंधित बॉक्‍समध्ये जमा होणार असल्याने पाहता येणार नाही, असे जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी सांगितले.
अत्याधुनिक ईव्हीएम जिल्ह्याला मिळाल्या आहेत. 9,436 बॅलेट तर 5,486 कंट्रोल युनिट आहेत. 5,486 व्हीव्हीपॅट मशीन मिळाल्या आहेत. या मशीन सरकारची कंपनी असलेल्या बी.ई.एल. व ई.सी.आय.एल. कंपनीकडून तयार केल्या आहेत. ईव्हीएम मशीनची प्राथमिक तपासणी कळमना येथे झाली. तपासणीत 89 बॅलेट युनिट, 127 कंट्रोल युनिट तर 375 व्हीव्हीपॅट मशीन खराब निघाल्या. त्या कंपनीला परत केल्या आहेत. व्हीव्हीपॅट व ईव्हीएमच्या तपासणीसाठी पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले होते. तपासणीच्या वेळी एकाही लोकप्रतिनिधीकडून विरोध दर्शविण्यात आला नाही किंवा आक्षेप घेण्यात आला नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुद्‌गल यांनी सांगितले. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतदान झालेल्या व्यक्‍तीचे नाव, पक्षाचे चिन्ह व मतदान ओळख पत्रातील क्रमांक स्लीपमध्ये दिसेल. ही स्लीप सात सेकंद राहील. त्यानंतर स्लीप व्हीव्हीपॅट मशीनला असलेल्या डब्यात जमा होईल, असेही ते म्हणाले.
आक्षेप घेता येईल
मतदान करताना व्हीव्हीपॅट मशीनच्या स्लीपमध्ये दुसऱ्याच उमेदवाराचे चिन्ह दिसल्यास, तसे वाटल्यास किंवा स्लीप न दिसल्यास मतदाराला केंद्रप्रमुखाकडे फॉर्म 17 ए भरून आक्षेप नोंदविता येईल. स्लीप मतदारांना मिळणार नसल्याचे मुद्‌गल यांनी सांगितले.  
एक मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅट स्लीपची तपासणी
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील एका मतदान केंद्रावरील ईव्हीएममधील मत, मतदार यादीतील नोंद व व्हीव्हीपॅट स्लीपची तपासणी होणार आहे. यात तफावत आढळ्यास संबंधित ठिकाणी नव्याने मतदान होईल, असेही मुद्‌गल यांनी सांगितले.

ईव्हीएम कॅल्क्‍युलेटर प्रमाणे आहे. त्याचा कोणत्याही इतर वस्तूशी संबंध येत नाही. त्यामुळे त्याला हॅक करणे किंवा दुरून हाताळणे शक्‍य नाही. नवीन मशीन अतिशय सुरक्षित आहे.
- अश्‍विन मुद्‌गल, जिल्हाधिकारी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT