विदर्भ

इंजिनिअर मुलीचे अश्‍लिल व्हिडीओ यु-ट्युबवर; पोलिसांनी असा लावला प्रकरणाचा छडा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः अभियंता असलेल्या तरूणीचे अश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ यु-ट्यूब आणि पॉर्न साईटवर टाकून बदनामी करीत 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या विदेशातील युवकाला नागपूर पोलिसांनी अटक केली. अत्यंत किचकट असलेल्या प्रकरणाचा सायबर क्राईमने हायटेक तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला आहे.

फिरोज अब्दुल रहीम अन्सारी ऊर्फ ऍन्ड्रयू अँडरसन ऊर्फ मार्टीन डिक्रुझ (29, रा. जमशेदपूर) असे आरोपीचे नाव असून त्याला 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. यापूर्वी डॉ. अभयकुमार ब्रिजकिशोर प्रसाद (39, रा. लोहियापुरा, पटना) आणि नौफल पी. पी. कुजीयन पुलीकरमबिल (रा. वैलातूर, मल्लपूरम, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली होती. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. अभयकुमार हा बंगळुरु येथील एसजीआर महाविद्यालयातील डेंटलचा विद्यार्थी आहे. त्याची ओळख सीताबर्डीतील एका सुप्रसिद्ध कापड व्यापाऱ्यांची 23 वर्षीय मुलगी जान्हवी (बदललेले नाव)ची फेसबूकवरून डॉ. अभयशी ओळख झाली. तीने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले असून तिला स्वीडन येथे पुढील शिक्षणासाठी जायचे होते.

दरम्यान तिच्या वडिलांचा व्यापार असून तिचा भाऊ व ती सांभाळू लागली. डॉ.अभय आणि जान्हवीचे प्रेम बहरले. दोघांचे संबंध एकमेकांना आपापले अश्‍लिल फोटो आणि व्हिडीओ बनवून पाठवू लागले. तिने मित्र म्हणून आपल्या कुटुंबांची पूर्ण माहिती अभयला दिली. बंगरूळूत तंत्रनिकेतनचे शिक्षण घेणाऱ्या फिरोज अब्दूलसोबत अभयची ओळख झाली. अभयने फिरोजला हाताशी धरून गर्भश्रीमंत असलेल्या जान्हवीकडून 25 लाखांची खंडणी उकळण्याचा प्लान केला. 

असे ओढले जाळ्यात 
फिरोजने ऑर्क्‍युटवर स्वत:चे ऍण्ड्रयू अँडरसन नावाने खाते उघडले व स्वीडन येथे शिकत असल्याचे दाखवले. त्यानंतर पीडितेला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली. ऑनलाईन चॅट करू लागली. त्यालाही तिने स्वत:चे अश्‍लील फोटो आणि व्हिडीओ पाठवले. प्लाननुसार त्याने फोटो आणि व्हिडीओ युट्यूबवर टाकण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. जान्हवीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार केली. पीआय विजय करे, विशाल माने, संतोष मदनकर, अमित भुरे, हेमंत गांजरे यांनी किचकट तपास हाती घेतला. 

फिरोज कुवैतमध्ये नोकरीला 
आरोपी फिरोज हा या काळात कुवेतमध्ये नोकरी करीत होता. पीडितेला तो धमकावण्यासाठी डॉलर कार्डमध्ये रिचार्ज करून आयटेल नावाच्या ऍपवरून तिला व्हाईस कॉल केला. त्याद्वारे संदेश व व्हॉटस ऍप करू लागला. यासाठी त्याने झेन टेलीकम्युनिकेशन कंपनीचा मोबाईल व सीमकार्ड वापरला. हा कॉल नेहमीच्या टेलीफोन एक्‍सचेंजवरून न करता अनधिकृत टेलिफोन एक्‍सचेंजवरून केला. 

असा लागला छडा 
खंडणीचे पैसे न मिळाल्याने फिरोजने कुवैतवरून जान्हवीची ब्ल्यू फिल्म युट्यूबवर टाकली. तसेच एक व्हिडीओ पॉर्नहब वेबसाईटवर टाकला. मात्र, जान्हवीने केवळ पाचच व्हिडीओ पाठविले होत. तर सहावा व्हिडीओ कुठून आला? असा संशय पोलिसांना आला. जान्हवीने डॉ. अभय याला व्हिडीओ पाठविल्याची माहिती देताच भारतातील आरोपी असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी प्रथम अभयकुमारला ताब्यात घेऊन चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ईदसाठी फिरोज हा दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला पोलिसांनी अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर भारताच्या शेजारील देशानेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रेल्वे रुळावरून घसरली CSMT लोकल; वहातूक ठप्प

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

SCROLL FOR NEXT