file photo
file photo 
विदर्भ

अभियंत्याला मारहाण! नगरसेविकेच्या पती, पुत्राविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विद्युत मीटरची तपासणी करण्यासाठी आलेल्या महावितरणच्या सहायक अभियंत्याला मारहाण केल्याप्रकरणी नगरसेविकेचा पुत्र व पतीविरुद्ध नागपुरीगेट पोलिसांनी मंगळवारी गुन्हा नोंदविला. समीर शहा कय्यूम शहा आणि कय्यूम शहा (रा. बिसमिल्लानगर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे याप्रकरणी सहायक अभियंता सौरभ संजय बारब्दे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला. श्री. बारब्दे भाजीबाजार तक्रार निवारण केंद्रात कार्यरत आहेत. समीर शहा हा ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या नगरसेविका साहेबाबी यांचा मुलगा आहे. त्याने विद्युत देयकावरून मीटरची तक्रार महावितरणच्या भाजीबाजार तक्रार निवारण केंद्रात केली होती. त्यावरून सहायक अभियंता सौरभ बारब्दे मीटरच्या तपासणीसाठी त्याच्या घरी गेले. तेव्हा त्याच्या देयकावरील व मीटरचे रीडिंग सारखेच आढळल्याने, देयक बरोबर आहे, यात काही होऊ शकत नाही, असे श्री. बारब्दे यांनी सांगितले. यावरून उभयतांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यादरम्यान बारब्दे यांना थापड मारून शिवीगाळ करण्यात आली. प्रकरणी समीरशहा याला अटक करण्यात आली. घटनेचा तपास नागपुरीगेट पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; सूत्रांची माहिती

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT