संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

अमरावती जिल्ह्यात मोठा साठा जप्त मात्र नेमका कशाचा?

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : विदेशी मद्याच्या 466 पेट्यांची वाहतूक करणारा ट्रक अमरावतीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्‍साइज) हिवरखेड ते सालबर्डी मार्गावर पकडला. अंदाजे 20 लाखांच्या मद्यासह ट्रक, असा 24 लाख 96 हजार 574 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.


रितेश राजेंद्र आर्य (वय 38, रा. चिंचोली, जि. बैतुल) व नीलेश रामदास शिवहरे (वय 31, रा. पट्टन, मुलताई), अशी अटक दोघांची नावे असून, त्यांचा एक साथीदार फरार झाला. एक सहा चाकांचा ट्रक हिवरखेड ते सालबर्डी मार्गावर मोर्शी एक्‍साइजच्या पथकाने पाळत ठेवून पकडला. त्यामध्ये मध्य प्रदेशात निर्मित विदेशी मद्यसाठ्याच्या 466 पेट्या होत्या.

एक्‍साइजचे निरीक्षक के. जी. आखरे, सहायक निरीक्षक रवी राऊतकर, दिनकर तिडके, राहुल जयस्वाल, सुजित जाधव, श्री. भोकरे यांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते. ट्रकमध्ये जप्त दारू बनावट आहे किंवा नाही, याबाबत सद्य:स्थितीत भाष्य करणे योग्य ठरणार नाही. दस्तऐवज आहेत, पण सापडलेल्या मद्याची तपासणी केल्या जाईल, असे एक्‍साइज अधिकाऱ्यांनी सांगितले.

ट्रक इटारसी येथून सालबर्डी येथे जात होता. वरुडच्या चेकपोस्टवर थांबून चालकाने महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाण्यासाठी वाहतूक पास घेणे गरजेचे होते. ट्रक न थांबता चेकपोस्टवरून पुढे निघाल्याने एक्‍साइजच्या पथकाने पाठलाग करून हा ट्रक पकडला.
राजेश कावळे, अधीक्षक एक्‍साइज, अमरावती.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: महायुतीचे उमेदवार पियुष गोयल उद्या उमेदवारी अर्ज भरणार

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT