Facebook Friend raped a woman The woman is four months pregnant
Facebook Friend raped a woman The woman is four months pregnant 
विदर्भ

फेसबूक फ्रेंडचा युवतीवर बलात्कार; युवती चार महिन्यांची गर्भवती 

अनिल कांबळे

नागपूर - फेसबूकवरून मैत्री केल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण केले. ती चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर गर्भपात करण्यासाठी बळजबरी केली. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून मित्राविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला. फैजूल आजमीन हसन अहमद (वय 31, रा. अहमद मंजील सैफी नगर, मोमीनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. 

शिवनगर खामल्यात राहणाऱ्या 21 वर्षीय अश्‍विनी (बदललेले नाव) हिची 10 फेब्रुवारी 2016 ला फैजूलसोबत फेसबुकवरून ओळख झाली. दोघांची मैत्री झाल्यानंतर भेटी वाढल्या. भेटीदरम्यान त्याने अश्‍विनीला लग्नाचे अमिष दाखवले. त्यानंतर अश्‍विनीला घरी बोलावून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिला वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बाध्य केले. 29 ऑगस्टला ती पोट दुखत असल्याने डॉक्‍टरांकडे गेली असता तिला गर्भवती असल्याचे कळले. ही बाब तिने फैजूलला सांगितली. त्याने लगेच तिला गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने लग्नाची गळ घातली. त्याने गर्भपात केल्यानंतर लग्नाचे बघू असे आश्‍वासन दिले. मात्र शेवटी त्याने लग्नास चक्‍क नकार दिला. त्यामुळे अश्‍विनीने फैजूलच्या आईवडीलाची भेट घेतली. त्यांनीही मुलाशी लग्न करून देण्यास नकार दिला. 

हुडकेश्‍वरला गुन्हा दाखल -
पीडित अश्‍विनीवर फैजूलने अपहरण करून बलात्कार केला होता. या प्रकरणी हुडकेश्‍वर पोलिसात त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्याला यापूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाली होती. ही केस मागे घेण्यासाठी अश्‍विनीवर दबाव टाकत होता. 

काही दिवस लिव्ह इन रिलेशनमध्ये -
फैजूलने अश्‍विनीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही खामल्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कुटूंबीयांशी बोलून लग्न करण्याचे आमिष तो नेहमी दाखवत होता. तिला मुंबईलाही फिरायला घेऊन गेला होता. मात्र, लग्न करण्याची वेळ येताच त्याने अश्‍विनीला जीवे मारण्याची धमकी दिली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT