विदर्भ

मिस यू बाप्पा!

सकाळ वृत्तसेवा
नागपूर : बाप्पांच्या आगमनामुळे गेल्या दहा दिवसांपासून घराघरांतील उत्सवाच्या वातावरणाची गुरुवारी सांगता झाली. ढोलताशांचा गजर, गुलाल उधळीत नागपूरकरांनी मिरवणूक काढून विसर्जन स्थळ गाठले अन्‌ पूजा आदींसह जड अंत:करणाने नागपूरकरांनी लाडक्‍या गणरायाला निरोप दिला. "गणपती बाप्पा मोरया' या घोषणांसह "मिस यू बाप्पा' स्टेटस ठेवत भाविकांनी गणरायाला "पुढच्या वर्षी लवकर या' अशी साद घातली. गुरुवारी दोन लाख 92 हजार मूर्तीचे विसर्जन करण्यात आले तर आजही मंडळांच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.
गेल्या दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर गुरुवारी संपूर्ण शहरात सायंकाळी सुरू झालेले श्रींचे विसर्जन उशिरा रात्रीपर्यंत सुरू होते. गणरायाच्या विसर्जनामुळे सकाळपासूनच गेल्या दहा दिवसांच्या उत्साहाऐवजी निरोप देण्याची तयारी सुरू होती. महापालिकेने शहराच्या चौक, वस्त्यांमध्ये 276 कृत्रिम टॅंकची सुविधा करून दिली होती. भाविकांनी या कृत्रिम टॅंकमध्ये भक्तिमय वातावरणात गणेशमूर्ती विसर्जित करीत निरोप दिला. घरगुती गणेशमूर्तींचे कृत्रिम टॅंकमध्ये तर मंडळाच्या गणेशमूर्तींची मिरवणूक काढत फुटाळा तलावावर विसर्जन करण्यात आले. शहराच्या प्रत्येक भागातून फुटाळा तलावावर गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांनी गर्दी केली. याशिवाय सक्करदरा, गांधीसागर, सोनेगाव, अंबाझरी, नाईक तलाव परिसरातही कृत्रिम टॅंक लावण्यात आले होते. कृत्रिम तलाव चौकांमध्ये असले तरी नागरिकांनी ढोलताशांचा गजर, गुलाल उधळीत तलाव गाठून तेथील कृत्रिम टॅंकमध्ये विसर्जन केले. "गणपती बाप्पा मोरया', "गणपती अपने गाव चले' आदी घोषणा, गीतांवर थिरकत तरुणाईने जल्लोष केला. चिमुकले, वृद्ध, ज्येष्ठ नागरिकही भजने गात विसर्जनासाठी तलावांवर पोहोचले. त्यामुळे एकीकडे बाप्पांच्या घोषणा, दुसरीकडे भजने आदींमुळे तलाव, कृत्रिम टॅंक असलेल्या चौकांत धार्मिक वातावरणनिर्मिती झाली. गणेश विसर्जनासाठी महापालिकेसोबत विविध सामाजिक, स्वयंसेवी संस्थांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला. त्यामुळे सर्वच तलावांवर निरामय वातावरणात विसर्जन पार पडले. आज रात्रीपर्यंत काही घरगुती गणेशमूर्तींसह गणेश मंडळांच्या मोठ्या मूर्तींचेही फुटाळा तलावात विसर्जन करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT