File photo
File photo 
विदर्भ

शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

बेनोडा शहीद (जि. अमरावती) : सततची नापिकी, डोक्‍यावर कर्जाचा डोंगर, मुलाचे शिक्षण, कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न असह्य झाल्याने शेतकऱ्याने कंटाळून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. 29) सकाळी बेनोडा शहीद येथे घडली.
विनोद किसनराव चढोकर (वय 40, रा. बेनोडा शहीद), असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
विनोद चढोकर यांच्याकडे एकत्र कुटुंबाची बेनोडा शहीद येथे चार एकर शेती आहे. शेतीत सतत तीन वर्षांपासून नापिकी होत होती. यावर्षी पाऊस समाधानकारक पडला. त्यामुळे कपाशी, तुरीचे पीक बऱ्यापैकी होते. मात्र खते, फवारणीकरिता पैसे नसल्याने हातचे आलेले पीक जाण्याच्या स्थिती असल्याच्या विवंचनेत शेतकरी विनोद चढोकर यांनी रविवारी (ता. 29) सकाळी आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
विनोद चढोकर यांच्या शेतीवर सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे पन्नास हजार रुपये कर्ज आहे. त्याच बरोबर लहान भावाच्या आजारपणात लाखो रुपये खर्च करून त्याला वाचविता आले नाही. त्यामुळे उसनवारीत घेतलेली रक्कम परत कशी करायची, या विवंचनेत सापडलेल्या विनोद चढोकर यांनी आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. विनोद यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, म्हातारे आईवडील असा परिवार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT