file photo
file photo 
विदर्भ

Vidhan Sabha 2019 : फडणवीस-देशमुखांमुळे लढत हायव्होल्टेज 

राजेश चरपे

नागपूर : दक्षिण-पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात कॉंग्रेसचे डॉ. आशीष देशमुख यांच्या दावेदारीने चुरस निर्माण झाली आहे. जयजवान जय किसानचे अध्यक्ष प्रशांत पवार, बसप व वंचित बहुजन आघाडीसह एकूण 20 उमेदवार येथे रिंगणात आहे. ते सर्व कॉंग्रेसच्या मतांवर हक्क सांगणारे असल्याने देशमुखांना आपली गोळाबेरीज आणखी वाढवावी लागणार आहे. 
देवेंद्र फडणवीस यांचा आजवरचा कार्यकाळ अपराजित असाच राहिला आहे. महापालिकेत प्रथमच निवडून आल्यानंतर ते महापौर झाले. यानंतर पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी कॉंग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख यांना पराभूत केले. तत्पूर्वी, त्यांनी याच मतदारसंघातून अशोक धवड यांनाही पराभूत केले होते. यानंतर दक्षिण-पश्‍चिम नागपूरची निर्मिती झाली. येथून त्यांनी सर्वप्रथम शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे त्यानंतर मागील निवडणुकीत ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांना पराभूत केले. राज्यात भाजपची सत्ता येताच मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. सत्ता आल्यास पुन्हा देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केले आहे. पंतप्रधानांनी केंद्रात नरेंद्र व राज्यात देवेंद्र हा फॉम्युला सुपरहिट असल्याचे जाहीर भाषणात सांगून शहा यांच्या मतास दुजोरा दिला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. 
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण लढणार असा प्रश्‍न कॉंग्रेसला भेडसावत होता. सुरुवातीला कोणीच लढण्यास तयार नव्हते. कॉंग्रेस तगड्या उमेदवाराच्या शोधात होती. त्यांनी आशीष देशमुख यांच्याकडे विचारणा केली. त्यांनी होकार दिल्याने कॉंग्रेससमोरचा पेच संपला. देशमुख बेधडक व स्पष्टवक्‍ते आहे. भाजपात असताना त्यांनी वारंवार दिलेल्या आश्‍वासनांची आठवण करून देऊन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणले होते. विशेष म्हणजे आशीष यांचे वडील कॉंग्रेस ज्येष्ठ नेते रणजित देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यापूर्वी एकमेकांच्या विरोधात लढले आहे. बापाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी आशीष देशमुख सज्ज झाले आहेत. उमेदवारी मिळाल्यापासून त्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. 
जय जवानचे अध्यक्ष प्रशांत पवार हे कॉंग्रेसकडून इच्छुक होते. ते आता अपक्ष लढा देत आहे. सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा त्यांचा हातखंडा आहे. मेट्रो रेल्वेची कामे व विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा स्टेडियमच्या बांधकामातील अनियमितता त्यांनी उघडकीस करून दोघांनाही अडचणीत आणले आहे. त्यांना बडेबडे वचकून असतात. याशिवाय बसप, वंचित आघाडीसह 19 उमेदवार येथे आहेत. हे सर्व उमेदवार कॉंग्रेसच्याच व्होटबॅंकेवर डल्ला मारण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: कुलदीप यादवचा राजस्थानला दुहेरी धक्का! एकाच षटकात दोन फलंदाजांना धाडलं माघारी

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT