fire at Dnyanganga wildlife sanctuary in Buldhana
fire at Dnyanganga wildlife sanctuary in Buldhana 
विदर्भ

ज्ञानगंगा अभयारण्यात आग; 10 हेक्टर जंगल जळाल्याचा अंदाज

सकाळवृत्तसेवा

बुलडाणा : खामगाव ते बुलडाणा मार्गावर वन्यजीवाचा वावर असलेले अभयारण्य गेल्या काही वर्षापासून, वन्यजीवासाठी मात्र असुरक्षित झाले आहे. गेल्या काही दिवसात आग लागण्याच्या घटना ताज्या असतानाच ज्ञानगंगा अभयारण्यात काल (बुधवार) आग लागल्याने जवळपास 10 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र जळाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, विलंबाने वन विभागाने याबाबत दखल घेत वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु, यामुळे वन विभागाचा गाफील असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

बुलडाणा, चिखली, मोताळा व खामगाव या चार तालुक्यात ज्ञानगंगा अभयारण्याचा विस्तार पसरलेला आहे. यात बिबट, अस्वल, तडस, कोल्हा, रानकुत्रे या हिंस्र प्राण्यासह नीलगाय, हरीण, रानडुक्कर, भेडकी, मोर, अजगर, विषारी-बिनविषारी साप आदी प्राण्याचा अधिवास आहे.

गेल्या 2 वर्षापूर्वी अमरावती वन्यजीव विभागाचे सीसीएफ म्हणून एम. एस. रेड्डी रुजू झाले व त्यांनी ज्ञानगंगा अभ्यारण्य मध्ये होणारी अवैध चराईवर पूर्णपणे बंदी आणली. यामुळे वन्यजीव व जंगलाचा भाग विस्तार होऊन अभ्यारण्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढलेला आहे. अशा परिस्थितीत काल दुपारी एक वाजेच्या दरम्यान बुलडाणा परिक्षेत्रातील उत्तर देव्हारी बिट मध्ये आग लागली.

आग जोरदार वाऱ्यामुळे पसरत गेली. सदर माहिती मिळताच बुलडाणा वन्यजीव विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहोचले व फायरब्लोअर व इतर साधनाने आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, तोपर्यंत जंगलाचा मोठा परिसर जळून खाक झाला.

वाहनधारकांवर ठपका
ज्ञानगंगा अभरण्यात सातत्याने आग लागल्याच्या घटना घडल्या असून, यावर ठोस उपाययोजना करण्याऐवजी वन विभाग बोथा मार्गावरून अभ्यारण्यातून बुलडाणा ते खामगाव हा मार्ग जातो,अनेक वाहनातून जाणारे प्रवासी बीडी-सिगारेट बाहेर फेकून देतात व अशा बेजबाबदार कृतीमुळे जंगलात आग लागल्याची घटना होत असल्याचे वन विभाग स्पष्ट करत आहे. यामुळे वाहनधारकांवर ठपका ठेऊन हात झटकण्याचे काम करत असल्याचे वन्यजीव प्रेमी सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT