file photo
file photo 
विदर्भ

पुरामुळे मेळघाटातील 27 गावांचा संपर्क तुटला

सकाळ वृत्तसेवा

धारणी (अमरावती)  ः मागील दोन-तीन दिवसांपासून संततधार पडत असलेल्या पावसामुळे मेळघाटातील संपूर्ण नद्या व नाले ओव्हरफ्लो झाले. सर्वच नद्यांना महापूर आला आहे. त्यामुळे नद्यांवरील पूल वाहून गेल्याने मेळघाटातील 27 ते 30 गावांचा संपर्क तुटला तसेच दळणवळणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मेळघाटातील गडगा, सिपना, खंडू, मधवा, ताप्ती या सर्व नद्यांना मुसळधार पावसामुळे महापूर आला. सिपना नदीचे पाणी हरिसाल येथील फैलढाणा या परिसरात शिरल्याने या परिसरातील जवळपास 20-25 घरांतील नागरिक रात्री प्रभावित झाले होते व त्यांच्या राहण्याचा व जेवणाची सोय हरिसाल येथील शाळेत धारणी तहसील प्रशासनातर्फे करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार सचिन खोडे यांनी दिली. सिपना नदीचे पाणी हरिसाल येथे मोठ्या पुलावरून वाहत होते. त्यामुळे अमरावती-बऱ्हाणपूर हा राज्य मार्ग सकाळी काही काळ पूर्णपणे बंद झाला होता, तर पुढे उतावली येथील पुलावरूनही पाणी वाहत असल्याने नागरिकांनी पूर पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती. पुरामुळे चाकर्दा, उकृपाली या रस्त्यावरील गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. तसेच सिपना नदीच्या पुराचे पाणी दुणी येथील ज्ञानमंदिर शाळेत शिरल्याने सर्वत्र पाणीच पाणी होते. यामुळे संगणक, इलेक्‍ट्रिकल सिस्टीमचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शाळा प्रशासनातर्फे मिळाली आहे. सिपना नदीच्या पुरामुळे दिया येथे धारणी, वैरागड मार्गावर असलेले जवळपास 27 ते 30 गावांचा संपर्क मुख्यालयाशी तुटलेला होता. तसेच मेळघाटातूनच वाहनाऱ्या गडगा नदीलाही पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गडगा व ताप्ती नदीचा संगम असलेल्या आमनेर किल्ल्याला पाण्याने दोन्ही बाजूने वेढले होते. पावसाच्या पाण्यामुळे विस्कळीत झालेल्या लोकांची सोय धारणी तहसील प्रशासनतर्फे करण्यात आली असून पाण्यामुळे नुकसान झालेल्यांची प्रशासनातर्फे योग्य ती मदत देण्याची माहिती तहसीलदार सचिन खाडे यांनी दिली. धारणी पोलिसांनी हायअलर्ट जारी केला असून अनेक नागरिकांना नदीकाठी जाण्याची सक्त मनाई केली आहे. तसेच नदीकाठी सेल्फी, पुराच्या पाण्यात जाणाऱ्या तरुणांना सक्त ताकीदही धारणीचे ठाणेदार कुळकर्णी यांनी दिली.

बाधित पूल
दिया-उतावली मुख्य रस्ता मार्ग क्रमांक 3 पुराच्या पाण्यात खचलेला आहे. धारणी-दिया-बैरागड पोचमार्ग खराब झाला असून, जिल्हा परिषद अधिनस्त असलेला ढाकणा गावाजवळील पूल खराब झाला आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT