विदर्भ

माजी आमदार धवड न्यायालयात शरण

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नवोदय बॅंकेत कोट्यवधीच्या घोटाळ्याचा आरोप असलेले माजी आमदार तसेच बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड आज न्यायालयात शरण आले. न्यायालयाने तूर्तास मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी केली असून, शासकीय पक्षाकडून उत्तर मागितले आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धंतोलीतील सिल्व्हर पॅलेस येथील नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील 38.75 कोटींच्या घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी माजी आमदार आणि बॅंकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह बॅंकेच्या अन्य पदाधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केले होते. 2010 ते 2015 या कालावधीत नवोदय बॅंकेचे तत्कालीन संचालक मंडळ, पदाधिकाऱ्यांनी बॅंकेच्या ठरावीक कर्जदारांना विनाकारण कर्ज दिले. तसेच काही कर्जदारांकडे थकबाकी असतानाही त्यांना ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन त्यांनी तारण ठेवलेल्या मालमत्तेचे दस्तऐवज परत करण्यात आले. काही वादग्रस्त मालमत्ता तारण ठेवून संचालक मंडळाने कर्जदारांना कर्ज दिले होते. संचालक व पदाधिकाऱ्यांनी बॅंकेतून पैशांची उचल केली. तसेच रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध घातल्यानंतरही पदधिकाऱ्यांनी बॅंकेचे आर्थिक व्यवहार सुरूच ठेवले होते. संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांनी या कालावधीत 38 कोटी 75 लाख 20 हजार रुपयांचा घोटाळा केला. सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष परीक्षक (भंडारा) श्रीकांत सुपे यांनी केलेल्या अंकेक्षणानंतर हा घोटाळा उघडकीस आला होता. सुपे यांच्या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी मे 2019 महिन्यात बॅंकेचे तत्कालीन अध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी व काही कर्जदारांविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. माजी आमदार अशोक धवड या कालावधीत बॅंकेचे अध्यक्ष होते. पोलिसांनी यापूर्वी तत्कालीन व्यवस्थापक राजेश बांते व राजेश बोगुल यांना अटक केली होती. 
कोर्टाने दिला दणका 
गेल्या 31 जुलै 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अशोक धवड यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्याविरुद्ध धवड यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्यायमूर्ती संजय कौल व के. एम. जोसेफ यांनी ते अपील खारीज केले. धवड यांना पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण व सत्र न्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज दाखल करण्यासाठी तीन आठवडे वेळ देण्यात आला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT