corona-agencies.jpg
corona-agencies.jpg 
विदर्भ

चार नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत; अहवाल प्राप्त झाल्यानंतर या जिल्ह्यातील चित्र होईल स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जिल्ह्यात आत्तापर्यंत एकच कोरोना बाधित रुग्ण आहे. प्रथमतः सदरील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ प्राप्त झाले होते. मात्र, सदरील रुग्णाचा अकोला जिल्ह्यात जेथेजेथे संपर्क आला होता. त्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या वाढली. ही बाब पाहता आरोग्य विभागाकडून सदरील कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांच्या ‘स्वॅब’चे नमुने शनिवारी (ता.11) पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, हे अहवाल रविवारी (ता.12) सायंकाळपर्यंत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे या अहवालाबाबत आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन व नागरिकांना उत्सुकता लागली आहे.

जिल्ह्यात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजनांना गती दिल्या जात आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण, सामाजिक दुरावा राखणे, बँकांचे कामकाज, जीवनावश्यक वस्तू खरेदीची मर्यादा कमी केली आहे. मात्र, असे असतानाही दिल्ली येथील कार्यक्रमातून आलेल्या मालेगाव तालुक्यातील एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला. त्यामुळे जिल्हा प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली होती. मात्र, त्यानंतर सदरील व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. तसेच बुलडाणा येथे गेलेल्या व्यक्तीसह त्याच्या संपर्कातील नागरिकांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटिव्ह’ आले. 

त्यामुळे जिल्ह्यात केवळ एकच रुग्ण कोरोना बाधित आहे. वेळीच सदरील बाधित इसमाच्या गावात उपाययोजनांची गती वाढविली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखल्या गेला. सदरील कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांचा आकडा अकोला जिल्ह्यात वाढला आहे. त्यामुळे सावधगिरीच्या दृष्टीने आरोग्य विभागाकडून सदरील व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांचे ‘स्वॅब’ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविले. मात्र, हे नमुने रविवारी (ता.12) सायंकाळपर्यंत प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे हे अहवाल काय येतात? याकडे प्रशासनासह नागरिकांचे सुद्धा लक्ष लागले आहे.

प्रशासनाकडून उपाययोजनांना गती
जिल्ह्यात केवळ एक व्यक्ती कोरोना बाधित आढळला. तसेच सदरील व्यक्ती हा दिल्ली येथील कार्यक्रमात देखील सहभागी झाला होता. त्यामुळे आरोग्य विभागाकडून तातडीने उपाययोजनांना गती देण्यात आली. जेणेकरून, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता कामा नये. संपूर्ण गाव तातडीने बंद केले. घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली. सोबतच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याबाबत घ्यावयाच्या उपाययोजनांविषयी मार्गदर्शन केले. या सर्व बाबींवर जिल्हाप्रशासनाने बारकाईने लक्ष ठेवले. त्यामुळे कोरोनाच्या संसर्ग थांबविण्यास यश आले.

अशी आहे स्थिती...
गृह अलगीकरण.............23
संस्थात्मक विलगीकरण....17
अलगीकरण कक्ष............05
आत्तापर्यंत घेतलेले नमुने....27
पॉझिटिव्ह अहवाल..........01
निगेटिव्ह अहवाल...........22
अहवाल अप्राप्त..............04

लवकरच प्राप्त होणार
कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबियाचे ‘स्वॅब’ नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या नमुन्यांचे अहवाल अद्याप प्राप्त झाले नाहीत. मात्र, हे अहवाल लवकर प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचे चित्र समोर येईल.
-डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा शल्यचिकित्सक, वाशीम

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT