Four fodder camps in a revenue board of khamgaon
Four fodder camps in a revenue board of khamgaon 
विदर्भ

एका महसूल मंडळात चार चारा छावण्या

श्रीधरढगे

खामगाव : राज्यातील दुष्काळी भागात जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने अखेर जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुष्काळी भागात एका महसूल मंडळात चार चारा छावण्या सुरु केल्या जाणार आहेत. पशु संख्या आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यावर तातडीने उपाययोजना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

गेल्या दोन वर्षापासून पाऊसमान घटत आहे. मागील खरीप हंगामात राज्यातील बहुतांश मध्ये सरासरीपेक्षा कमी पर्जण्यमान झाले. त्यामुळे जलसाठे भरले नाहीत. ग्रामीण भागात टँकर सुरु आहेत. जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. 

बहुतांश भागात हीच परिस्थिती असल्याने शासनाने राज्यातील 26 जिल्ह्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. या तालुक्यांव्यतिरिक्त  268 महसुली मंडळांमध्ये दुष्काळ आहे. तसेच,या क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील 931 गावांमध्ये दुष्काळसद्दश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती मुळे त्या भागातील पशुधनासाठी आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबतचा गंभीर प्रश्न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असलेल्या चाऱ्याच्या प्रश्नावर मात करण्यासाठी महसुल मंडळ स्तरावर जनावरांच्या चारा छावण्या उघडण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. एका महसूल मंडळात एक ते चारा छावणी सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. 

बुलडाणा जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ आहे. शेती आणि शेतकरी संकटात आहे. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आमच्या भागात तातडीने चारा छावन्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु होता. आता लवकरच जनावरांच्या चारा छावण्या सुरू होणार आहेत. दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी आहे. - अॅड. आकाश फुंडकर आमदार खामगाव विधानसभा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेत वाढ

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT