तिवसा : प्रवचन सादर करताना कीर्ती खन्ना व चमू.
तिवसा : प्रवचन सादर करताना कीर्ती खन्ना व चमू. 
विदर्भ

चारवेळा झाली राष्ट्रसंत-मेहेरबाबांची भेट

सकाळ वृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त प्रथमच गुरुकुंज मोझरी येथे मेहेरप्रेम सत्संग व चलचित्रपटाचे आयोजन अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र, अमरावती यांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी मेहेरबाबांची विविध भजने सुमधुर आवाजात सादर करण्यात आली. तसेच कीर्ती खन्ना यांनी मेहेरबाबा व तुकडोजी महाराज यांच्या दैवी भेटीचा प्रसंग उपस्थित भक्तांसमोर मांडला. त्यामध्ये त्यांनी सांगितले की, 1 नोव्हेंबर 1937 ला अवतार मेहेरबाबांची पहिली भेट ही नागपूरला झाली. तेव्हा अवतार मेहेरबाबांचा दर्शन कार्यक्रम होता. तेथे राष्ट्रसंत आणि अवतार यांचे दैवी मीलन झाले. राष्ट्रसंतांनी बाबांसमोर भजने सादर केली. यानंतर राष्ट्रसंतांनी बाबांना विनंती केली की, सोबत जे अनुयायी आलेत त्यांना दर्शन द्या, तेव्हा राष्ट्रसंतांनी बाबांना आपल्या खांद्यावर घेतले असल्याचा तो प्रसंग सविस्तर सांगण्यात आला. त्यानंतर दुसरी भेट ही 11 नोव्हेंबर 1944 ला झाली. गोरक्षण येथे बाबांचा दर्शनसोहळा आयोजिण्यात आला होता, तेथेसुद्धा राष्ट्रसंतांनी भजने सादर केली. 1955 ला मेहेराझाद येथे विश्‍वशांती व विश्‍व धर्माचे एक मोठे संमेलन आयोजित केले होते. तेथे मेहेरबाबांनी राष्ट्रसंतांना आमंत्रित केले होते, तेव्हा महाराजांनी तेथील बाबांचा आश्रम बघितला असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी अवतार मेहेरबाबा आध्यात्मिक केंद्र अमरावतीचे अध्यक्ष प्रमोद रोहणेकर, सचिव रामचंद्र चुटे, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र तंबाखे, श्री. मेटे, सुरेश रंगे यांच्यासह बाबाप्रेमी मंडळी उपस्थित होती. नागपूर येथील सुधाकर गुंबळे यांनी बाबांचे संपूर्ण जीवनदर्शन घडविणारी फिल्म दाखविली. कार्यक्रमाचा समारोप मेहेरबाबांच्या आरती व प्रसाद वाटप करून झाला. यावेळी भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT