Leopard
Leopard 
विदर्भ

मृत्यूसत्र बिबट्यांचे! 

अनुप ताले

अकोला : ‘मृत्यूसत्र बिबट्यांचे’ ऐकून आश्चर्य वाटले ना! पण हे सत्य आहे. अकोला जिल्ह्यात जवळपास दर दोन महिन्यातून एका बिबट्याचा मृत्यू होत असून, वर्षभरात सहा बिबट ठार झाल्याची बाब उघडकीस आली आहे. 

वन्यजीव विभाग तसेच वनविभागाचा (प्रादेशिक) बराचसा जंगल प्रदेश अकोला जिल्ह्यात आहे. यामध्ये बिबट, अस्वल, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा मांसभक्षी तर, निलगाय, हरीण, काळविट, तडस, माकड, ससा वनस्पती खाऊन जगणारे प्राणी आहेत. वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे काम मांसभक्षी प्राणी करीत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांत बिबटांच्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढल्याने, ही साखळी विस्कळीत झाली असून, लोकवस्ती व शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगूस वाढला आहे. 2018 मध्ये सुद्धा जिल्ह्यात सहा बिबटांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला असून, त्यांचे संवर्धन झाले नाही तर, जिल्ह्यातून हा महत्त्वाचा वन्यप्राणी नामशेष होऊ शकतो. 

वर्षभरात बिबट्यांचे मृत्यू 
वर्षभरात जिल्ह्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यात वरखेड, धानोरा, चिंचोली तर, अकोला तालुक्यात निंबा, सौदळा आणि कोठारी येथे प्रत्येकी एक, अशा एकूण सहा बिबट्यांच्या मृत्यूची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. 

...खुणावतेय 20 वे शतक 
20 व्या शतकात जिल्ह्यात व लगतच्या परिसरात पट्टे वाघ व बिबट्यांची बरीच संख्या होती. मात्र याच काळात जिल्ह्यामध्ये वाघाच्या कातड्याची, अस्थिंची तस्करी होत असल्याची बाब उघड होऊन मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या. अनेकांना शासन झाले तर, काही प्रकरणे अजूनही न्यायप्रविष्ठ आहेत. 2018-19 मध्ये अकोल्यात पुन्हा बिबट्यांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाले आहे. त्यांच्या मृत्यूसाठी अपघात किंवा आजारांचे कारण सांगितले जात असले तरी, एकापाठोपाठ झालेल्या या मृत्युंमुळे 20 व्या शतकातील प्रकरणांची पुनरावृत्ती तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

बिबट, वाघ निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचा प्राणी असून, मानवी आधार घेऊन तो जगतो. रानडुकरे, निलगाय, हरीण इत्यादी पीक नुकसान व मनुष्यांवर हल्ला करणाऱ्या प्राण्यांचे भक्षण बिबट करतो. बिबट संपले तर, शेती व मानवी जीवन धोक्यात येईल. त्यामुळे या सर्व बाबींवर कंट्रोल ठेवणाऱ्या बिबटाचे, वाघाचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
- अमोल सावंत, निसर्गकट्टा. अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT