swachh-bharat-abhiyan
swachh-bharat-abhiyan 
विदर्भ

स्वच्छ भारत अभियानात गैरव्यवहार उघड! सात कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांवर ठपका

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : बडनेरा झोनमध्ये घडलेल्या वैयक्तिक शौचालय घोटाळ्याचा अंतिम अहवाल चौकशी समितीने आयुक्तांना सोपविला आहे. या अहवालात 2 कोटी 34 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे व योजना सुरू झाली तेव्हापासूनच घोटाळ्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले. केवळ 74 लाख 80 हजार रुपये गैरव्यवहारातून वाचले. बडनेरा झोनमधील घोटाळ्यात सात कंत्राटदारांसोबत अधिकाऱ्यांवरही ठपका ठेवण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिकेच्या बडनेरा झोनमध्ये आर्थिक घोटाळा समोर आला आहे. 74 लाख 80 हजार रुपयांची तीन बनावट देयके आयुक्तांकडे मंजूरीकरीता आल्यानंतर त्यांनी केलेल्या चौकशीत घोटाळा उघडकीस आला. तत्कालीन उपायुक्त विजय खोराटे यांनी केलेल्या चौकशीत लेखा विभागातील अनुप सारवान हा कनिष्ठ लिपिक व बडनेरा झोनमधील कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर यामध्ये सामिल असल्याचे उघड झाले. दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

आयुक्तांनी बडनेरा झोनमधील या योजनेतील सर्वंकष चौकशीसाठी उपायुक्त सुरेश पाटील यांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती नियुक्त केली. या समितीने योजना कार्यान्वित झाल्यापासूनचा व्यवहार तपासला. यामध्ये तब्बल 2 कोटी 34 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे म्हटले आहे. कंत्राट आर. के. कन्स्ट्रक्‍शन व चेतन बिल्डर्सच्या नावे घेण्यात आले होते.

कामाचे पैसे मात्र मुळ कंत्राटदारासह बेस्ट बिल्डींग मटेरियल सप्लायर,ओमशांती बिल्डींग मटेरियल सप्लायर,ऋषीकेश सांगोले,पवन शेंडे,प्रणय मेहरे,सुभाष निमकर्डे व चेतन कन्स्ट्रक्‍शन अशा सात जणांच्या नावावरील खात्यात जमा करण्यात आले आहेत. जे लाभार्थी दर्शविण्यात आले ते खोटे असून काही ठिकाणी बांधकामच झालेले नाही हे स्पष्ट झाले आहे. समितीने सात पैकी सहा जणांचे बयाण नोंदविले असून एका कंत्राटदार आला नाही.

सविस्तर वाचा - कोणी तोडले रुग्णालयाचे दार तर कोणी खुर्च्या.. 'त्या' प्रकारानंतर अमरावतीकरांचा संताप अनावर.. वाचा सविस्तर..


समितीने आपल्या अहवालात सात कंत्राटदारांसोबतच सहायक आयुक्त, उपअभियंता, अभियंता, स्वास्थ्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांच्यात समन्वय नव्हता, त्यामुळे घोटाळ्यास मुभा मिळाली असा ठपका ठेवला आहे. या प्रकरणात घोटाळा करणाऱ्या कंत्राटदारासोबतच अधिकारी व लाभार्थ्यानार्ही दोष देण्यात आला आहे. लवकरच पोलिसात दुसरी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT