छायाचित्र
छायाचित्र 
विदर्भ

भावी पत्रकारांनी विवेकबुद्धीचा वापर करावा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : पत्रकारिता हे एक कौशल्य असून बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि चातुर्यासोबतच प्रसंगानुरूप विवेकबुद्धीचा वापर करावा असा हितोपदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी भावी पत्रकारांना दिला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या जनसंवाद विभागाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, माजी विभागप्रमुख प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ पत्रकार व विभागाच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र आणि जनसंवाद विभागाचे विभागप्रमुख डॉ. मोईज हक उपस्थित होते.
डॉ. काणे म्हणाले, 25 वर्षात तंत्रज्ञानामध्ये घडलेल्या अफाट विकासासोबतच येणाऱ्या काळात त्यात होऊ शकणाऱ्या विकासाचे महत्त्व आय-सायबर या केल्विन वॉर्मिक याच्या कम्युनिकेशन आणि शरीरावरील इलेक्‍ट्रोमेकॅनिकल डिव्हाईसेस'वर आधारित थेअरीतून विशद केले.
प्रा. शरद पाटील यांनी विद्यार्थ्यांना सतत सजगता, शिस्त तसेच वेळेचे नियोजन करून प्रसंगांना सामोरे जाण्याचा सल्ला दिला. प्रदीपकुमार मैत्र यांनी जनसंवाद विभागात मीडिया मॅनेजमेंट, वार्तांकन कौशल्ये आणि भाषा विषयाचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी सुचविले. डॉ. विनायक देशपांडे यांनीही नीतीमूल्यांवर आधारित पत्रकारिता आणि माध्यम स्वातंत्र्य एका नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगितले. प्रास्ताविक डॉ. मोईज हक यांनी केले. सुवर्णमहोत्सवी वर्षात 2020 फेब्रुवारीमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले. या प्रसंगी माजी विभागप्रमुख प्रा. के.जी. मिसार, प्रा. चंद्रशेखर गुप्ता, प्रा. डॉ. विनोद इंदूरकर आणि प्रा. शरद पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. जनसंवाद विभागाच्या विद्यार्थ्यांद्वारे संपादित वार्षिकांक "कॅम्पस'चे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. वर्षभर आयोजित विविध स्पर्धांमध्ये आणि उपक्रमांमध्ये प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
संचालक अमर अणे यांनी केले. आभार प्रा. स्निग्धा खटावकर यांनी मानले. आजी माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंथन पटले, प्रियंका देवासे, नुसरत खान आणि शुभम दुर्गे, मेघा रोकडे, पूजा पराते, आराधना दुबे, पूजा जांगडे आणि दिशा करेशिया व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT