dam
dam sakal
विदर्भ

अमरावती विभागातील २७ धरणांचे दरवाजे उघडले

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : सप्टेंबरमधील पावसाने धरणांमधील जलपातळी चांगलीच वाढली आहे. अमरावती विभागातील तब्बल २७ धरणांची दरवाजे खबरदारी म्हणून उघडण्यात आले आहेत. तर, चौदा मध्यम व एक मोठ्या धरणांत शंभर टक्क्यांवर जलसाठा झाला आहे.

पश्चिम विदर्भात नऊ मोठे, २५ मध्यम व ४७७ लघु मध्यम सिंचन प्रकल्प आहेत. सप्टेंबरमधील पावसाने या सर्व धरणांतील पाणीपातळीत चांगलीच वाढ झाली आहे. बुलडाण्यातील नळगंगा व पेनटाकळी, तसेच यवतमाळमधील अरुणावती प्रकल्प वगळता उर्वरित अमरावती मधील अप्पर वर्धा, यवतमाळमधील पूस, बेंबळा, अकोल्यातील काटेपुर्णा व वान तसेच बुलडाण्यातील खडकपुर्णाची दरवाजे उघडण्यात आली आहे. काहींची दरवाजे दोन ते तीनवेळा उडण्याची वेळ पावसाने जलसंपदा विभागावर आणली असून या सहा मोठ्या धरणांतून तर पंचवीस मध्यम प्रकल्पांपैकी २१ मधून विसर्ग सुरू आहे.

१४ मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरली आहे. पावसाळ्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या वारंवार व दमदार पावसामुळे कोरडे पडण्याच्या मार्गावर असलेल्या धरणांमधील पाणीपातळी वाढली. अमरावती विभागात सद्यस्थितीत ८८ टक्के जलसाठा झाला आहे. नऊ मोठ्या, पंचवीस मध्यम व ४७७ लघु प्रकल्पांची एकूण ३२८३ दलघमीची क्षमता आहे. त्यापैकी सध्या २९०७ दलघमी जलसाठा झाला आहे. यातील मोठ्या प्रकल्पांत १३२० दलघमी (९४ टक्के), मध्यम प्रकल्पांत ६५३ दलघमी (८९ टक्के) व लघू प्रकल्पांत ९३३ दलघमी (८१ टक्के) जलसाठ्याचा समावेश आहे.

या धरणांतून सुरू आहे विसर्ग

अप्पर वर्धा, पूस, बेंबळा, काटेपुर्णा, वान, खडकपूर्णा, शहानूर, चंद्रभागा, पूर्णा, सपन, अधरपूस, सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, नवरगाव, निर्गुमा, मोर्णा, उमा, घुंगशी बॅरेज, अडाण, सोनल, एकबुर्जी, ज्ञानगंगा, कोराडी, मन व उतावळी या धरणांतून विसर्ग सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Yoga Tips : उत्तम पचनक्षमतेसाठी योगा फायदेशीर, जेवण झाल्यावर करा ‘या’ योगासनांचा सराव

SCROLL FOR NEXT