crime
crime 
विदर्भ

विनयभंग करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या

सकाळवृत्तसेवा

नांदेड : सतत पाठलाग करून विनयभंग करणाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून एका युवतीने घराच्या छतावरून उडी घेतली होती. यात ती गंभीर जखमी झाली होती. ही घटना राजनगर भागात रविवारी (ता. २१) घडली होती. परंतु ती कोमात गेल्याने तिचा मंगळवारी (ता. ३०) मृत्यू झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन मारोती धोंडिबा साखरे हे सहशिक्षक पौर्णिमानगर भागात निवृत्त व्यंकटराव गोपाळे (वय ६५) यांच्या घरी किरायाने परिवारासह राहत होते. परंतु त्यांची मुलगी वर्षा (वय १७) हिचा घरमालक गोपाळे याने विनयभंग केला होता. या प्रकरणी त्याच्याविरूध्द विमानतळ ठाण्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये बाललैंगीक अत्याचार प्रतिबंध आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. यानंतर मारोती साखरे यांनी त्यांचे घर खाली करून ते किरायाने राजनगर भागातील भगवान गायकवाड यांच्याकडे राहायला आले. त्यांची मुलगी यशवंत महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

सदर मुलीला रस्त्यात अडवून व्यंकटराव गोपाळे आणि त्याचा मुलगा चंद्रमुनी गोपाळे हे आमच्यावरील दाखल केलेला गुन्हा मागे घे असे म्हणून धमकी देत असत. त्यांनी अनेकवेळा तिच्या मैत्रीणींसमोर विनयभंग केला. सतत होणाऱ्या या छळाला कंटाळून तीने २१ आॅक्टोबर रोजी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. यात ती गंभीर जखमी होऊन कोमात गेली. येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला केईएम, मुंबई येथे दाखल केले. परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने हतबल पित्याने तिला त्याच अवस्थेत परत नांदेड शासकिय रुग्णालय, विष्णुपूरी येथे दाखल केले. येथे उपचार सुरू असतांना तिचा मंगळवारी मृत्यू झाला. मारोती साखरे यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात भादवीच्या ३०६ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाला.  फौजदार श्रीदेवी पाटील यांनी लगेच आपले सहकारी विष्णु मुंडे, श्री. चाटे आणि तेलंग यांना सोबत घेऊन मंगळवारी रात्री आरोपी पिता- पुत्राला अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता दोघांनाही पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT